ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
स्वच्छ चारित्र्य, मजबूत नेतृत्व… अमर मगर नगराध्यक्षपदाचे दावेदार
नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत महाविकास आघाडीतून अमर मगर चर्चेत
0
7
6
4
9
6
नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत महाविकास आघाडीतून अमर मगर चर्चेत

स्वच्छ चारित्र्य, मजबूत नेतृत्व… अमर मगर नगराध्यक्षपदाचे दावेदार
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून येत्या २ डिसेंबरला होणाऱ्या मतदानाची उलटी गिनती सुरू झाली आहे. शहरात सध्या एकच चर्चा रंगली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होण्याचे संकेत मिळत असून महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमर अशोकराव मगर यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी सर्वाधिक चर्चेत आहे.

तुळजाभवानी मातेसमोरील या ऐतिहासिक नगरीचे नेतृत्व कोणाकडे जाणार, याबाबत उत्सुकता वाढत असताना अमर मगर यांच्या नावाला सर्वाधिक लोकमान्यता मिळत असल्याचे चित्र आहे. काँग्रेसचा वारसा असलेल्या मगर कुटुंबाने शहरात जवळपास १५ वर्ष निस्वार्थी समाजकारण केले. स्वर्गीय अशोकभाऊ मगर यांनी विरोधी पक्षात राहूनही जनतेचा आवाज बुलंद केला. त्यांची पारदर्शकता व जिद्द आजही नागरिकांच्या स्मरणात आहे. त्याच कामाच्या परंपरेला अमर मगर यांनी पुढे नेले.

२००१ पासून नगरसेवक म्हणून तीन दशकांच्या जवळपास अनुभवासह २००३ मध्ये उपनगराध्यक्ष पद भूषविलेल्या अमर मगर यांनी शहरातील व्यापारी, पुजारी, भाविक तसेच ग्रामीण जनतेशी सातत्याने संपर्क ठेवत सेवा केली आहे. साधेपणा, मनमिळावूपणा आणि लोकांशी संवाद हा त्यांचा ठसा कायम राहिला. अडचणीत धावून जाण्याची त्यांची तयारी कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरली.

गेल्या दोन दशकांत एकही वाद, भ्रष्टाचाराचा आरोप किंवा गुन्हा त्यांच्या नावावर नाही. स्वच्छ चारित्र्य, निपक्षपाती कामकाज आणि विनयशील वागणूक यामुळे ते तुळजापूरच्या राजकारणात वेगळे ठरतात. आज शहरात झगमगाट दाखवणारे अनेक नेते दिसतात, मात्र जमिनीवर राहून काम करणारा नेता म्हणून नागरिकांचा ओढा अमर मगर यांच्या दिशेने असल्याचे चित्र दिसत आहे.

अमर मगर यांच्या नेतृत्वात दूरदृष्टी असल्याचे कार्यकत्यांचे मत आहे. भाविकांसाठी सुविधा, व्यापाऱ्यांच्या समस्या, शहराच्या पायाभूत सुविधा, ग्रामीण भागातील गरजा अशा अनेक विषयांवर त्यांनी सातत्याने काम केले. शासन दरबारी पाठपुरावा करून नागरिकांच्या हक्कांसाठी आवाज उठविण्याची त्यांची तयारी ग्रामीण ते शहरी सर्व घटकांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरली.
प्रामाणिकपणा आणि नैतिकता या गुणांमुळे समाजातील सर्व स्तरातील लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असल्याने त्यांना मजबूत नेतृत्व म्हणून पाहिले जाते.
यामुळेच महाविकास आघाडीतील अनेक घटकांनी नगराध्यक्ष पदासाठी अमर मगर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, अशी जोरदार चर्चा शहरभर आहे. तुळजापूरच्या विकासाचा मार्ग प्रामाणिक आणि सक्षम नेतृत्वात आहे, असा नागरिकांचा विश्वास असून त्यात अमर मगर यांचे नाव अग्रस्थानी आहे.
0
7
6
4
9
6



