Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपची “भाकरी” फिरणार का?

सामान्य मतदारांमध्ये वाढली उत्सुकता!

0 7 6 4 9 6

प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपची “भाकरी” फिरणार का?

सामान्य मतदारांमध्ये वाढली उत्सुकता!

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. प्रभाग क्रमांक १ तुळजापूर खुर्द मधील उमेदवारीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी भाजपकडून कोणत्या इच्छुकाला उमेदवारीची संधी मिळणार? — हा सध्या चर्चेचा प्रमुख विषय ठरला आहे.
या प्रभागाची भौगोलिक रचना सारा गौरव, गवते प्लॉटिंग, तुळजाई नगर, समर्थ नगर, शिवरत्न नगर व लातूर रोड परिसर अशी असून एकूण २,१८८ मतदार आहेत — त्यात १,१०५ पुरुष आणि १,०८३ महिला मतदारांचा समावेश आहे.

मात्र या वेळच्या मतदान केंद्राच्या नियोजनावरून मतदारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सारा गौरव, गवते प्लॉटिंग व समर्थ नगर येथील मतदारांना शाळा क्र. ३ तुळजापूर खुर्द येथे मतदानासाठी अर्धा ते एक किलोमीटरचे अंतर पार करावे लागणार आहे. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

▪️ मागील निवडणूक : राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस-भाजप आघाडी

२०१५ च्या निवडणुकीत या प्रभागात काँग्रेस-भाजप आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढत रंगली होती.
राष्ट्रवादीकडून पंडीत जगदाळे व मंजुषा देशमाने तर आघाडी कडून आनंद जगताप व अॅड. अंजली साबळे रिंगणात होते.
चुरशीच्या लढतीत पंडीत जगदाळे यांनी १०१७ मते, तर आनंद जगताप यांनी ७७१ मते मिळवली.महिला जागेवर मंजुषा देशमाने यांना ११८४ मते, तर अंजली साबळे यांना ६२८ मते मिळाली.यावरून क्रॉस मतदानाचे चित्र स्पष्ट झाले होते.

विशेष म्हणजे, जगदाळे यांच्या विजयात नारायण नन्नवरे यांची मोठी भूमिका होती.
२०११ मध्ये शेकापमधून राष्ट्रवादीत प्रवेश करत जगदाळेंनी त्यावेळी नन्नवरे यांचा “पत्ता कट” केला होता. तरीही नन्नवरे यांनी कोणतीही कटुता न ठेवता मागील निवडणुकीत त्यांचा प्रचार केला होता.

▪️यावेळची समीकरणे

या प्रभागाचे आरक्षण अ) सर्वसाधारण स्त्री आणि ब) सर्वसाधारण असे असून भाजपकडून नारायण नन्नवरे, पंडीत जगदाळे, प्रसाद पानपुडे, मंजुषा देशमाने व अॅड. अंजली साबळे या इच्छुकांनी उमेदवारीसाठी मागणी दाखल केली आहे.
मात्र स्थानिक पातळीवर पक्षाने जगदाळे आणि देशमाने यांनाच “कामाला लागा” असा आदेश दिल्याची चर्चा आहे. यामुळे नन्नवरे यांचे समर्थक नाराज असून, त्यांना उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष किंवा अन्य पक्षातून लढण्याचा दबाव वाढत आहे.

▪️नाराजीची लाट आणि विकासाचा मुद्दा

जगदाळे यांनी सलग चार टर्ममध्ये विविध विकासकामे केली असली तरी हद्दवाढ भागांतील रस्ते, नाल्या व मूलभूत सुविधांचा अभाव, तसेच कथित यात्रा मैदान विक्री प्रकरणामुळे मतदारांत नाराजी वाढली आहे.
हा मुद्दा कमान वेस, जवाहर गल्ली परिसरातील पुजारी वर्गासह अनेक मतदारांसाठी संवेदनशील ठरला आहे. अशा स्थितीत पक्षाने पुन्हा जगदाळेंवर विश्वास ठेवला, तर त्याचा फटका भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारालाही बसू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.दरम्यान, महाविकास आघाडीने नारायण नन्नवरे यांना गळाला लावण्यासाठी हालचाली सुरू केल्या असल्याचे सूत्र सांगतात.

▪️प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपची “भाकरी” यावेळी फिरते की करपते

हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.मतदार मात्र म्हणताहेत — “यावेळी आमची भाकरी कोणावर फिरते ते पाहू!”
3.3/5 - (3 votes)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे