प्रभाग क्रमांक आठमध्ये श्रीराजे गवळींची उमेदवारी; असंख्य युवकांचा भाजपमध्ये प्रवेश
प्रभाग क्रमांक आठमध्ये श्रीराजे गवळींची उमेदवारी; असंख्य युवकांचा भाजपमध्ये प्रवेश
प्रभाग क्रमांक आठमध्ये श्रीराजे गवळींची उमेदवारी; असंख्य युवकांचा भाजपमध्ये प्रवेश
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
प्रभाग क्रमांक आठमधून माजी नगराध्यक्ष कै. नारायणराजे गवळी यांचे चिरंजीव श्रीराजे गवळी यांनी नगरसेवक पदासाठी रिंगणात अधिकृतपणे प्रवेश केला आहे. माजी नगरसेविका भारतीताई नारायणराजे गवळी यांची उपस्थिती यावेळी विशेष ठरली.

तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील, जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, तुळजापूरचे युवा नेते विनोद गंगणे तसेच स्व. नारायणराजे गवळी यांच्या कार्याची परंपरा पुढे नेत श्रीराजे गवळी यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर शहरातील मोठ्या प्रमाणावर युवकांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश झाला.

भाजपच्या वतीने प्रवेश करणाऱ्या सर्वांचे स्वागत करून त्यांना पक्षाच्या धोरणांसाठी काम करण्याचे आवाहन करण्यात आले.या प्रवेश सोहळ्यास राम चोपदार, आप्पा पवार, माजी नगरसेवक शहाजी जाधव, नितीन नलवडे यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला, तर विकी मांडवले, विष्णू बनपट्टे यांच्यासह अनेक युवकांनी विश्वासाने भाजपचा कमळाचा झेंडा हाती घेतला.

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाचा राजकीय समीकरणांवर महत्त्वाचा परिणाम होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात असून, महायुतीच्या विजयासाठी सर्व कार्यकर्त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे.




