ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजापूर तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे.; तुळजापूर नगरी ऊर्जादायी तीर्थक्षेत्र आहे – पाडूरंग कोळगे
तुळजापूर तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे.; तुळजापूर नगरी ऊर्जादायी तीर्थक्षेत्र आहे - पाडूरंग कोळगे

0
7
6
5
0
5
तुळजापूर तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे.; तुळजापूर नगरी ऊर्जादायी तीर्थक्षेत्र आहे – पाडूरंग कोळगे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यास मनाला प्रसन्न वाटते.कुटुंबाला नवचैतन्य प्राप्त होते,तुळजापूर नगरी ही खरोखरच ऊर्जादायी तीर्थक्षेत्र असल्याची भावना दैनिक एकमत माजी संपादक तथा माजी मंत्री आणि विद्यमान आमदार अमित देशमुख यांचे विश्वासू पांडूरंग कोळगे यांनी दर्शनानंतर व्यक्त केली.पत्रमहर्षी, विचारवंत मार्गदर्शक, शब्दप्रभू, उत्तम व्यवस्थापक तथा दैनिक एकमत माजी संपादक यांनी सहकुंटूब श्री तुळजाभवानी मातेची विधीवत पुजा करून मनोभावे दर्शन घेतले.पांडूरंग कोळगे यांनी भवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने व पोलिस बालाजी जाधव, अमोल क्षिरसागर, तुळजापूर तालुका पत्रकार संघ उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी यांनी तुळजाभवानी मातेची प्रतिमा शाल,श्रीफळ, फेटा बांधून सहकुटुंबाचा सत्कार केला.

सत्कारानंतर बोलताना कोळगे म्हणाले की, तुळजापूर हे तीर्थक्षेत्र जागतिक पटलावर यायचे असल्यास येथील मूलभूत सुविधावर अधिक काम होणे आवश्यक आहे, देविभक्तांना सहज सुलभ तुळजाभवानी मातेचे दर्शन मिळेल याची व्यवस्था करणे गरजेचे आहे, भाविकांची वाढती संख्या पाहता तुळजापूर शहराचा सर्वांगीण विकास महत्वाचा वाटतो अशी भावना व्यक्त केली.यावेळी तुळजापूर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, पोलिस बालाजी जाधव, अमोल क्षिरसागर, मंदिर संस्थानचे रविंद्र भराटे, प्रशांत जाधव, पुजारी आप्पा चोपदार आदी उपस्थित होते.

0
7
6
5
0
5



