ब्रेकिंगमहाराष्ट्र
देवीच्या दर्शनाला आलेल्या गोरगरीब वर्गातील भाविकांनसाठी आठवडा बाजारात राहुल भोसले यांची मोफत पाणी टँकर सेवा; गरीब भाविकांना मोठा दिलासा
देवीच्या दर्शनाला आलेल्या गोरगरीब वर्गातील भाविकांनसाठी आठवडा बाजारात राहुल भोसले यांची मोफत पाणी टँकर सेवा; गरीब भाविकांना मोठा दिलासा

0
7
6
4
9
9
देवीच्या दर्शनाला आलेल्या गोरगरीब वर्गातील भाविकांनसाठी आठवडा बाजारात राहुल भोसले यांची मोफत पाणी टँकर सेवा; गरीब भाविकांना मोठा दिलासा
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तीर्थक्षेत्र तुळजापूरमध्ये श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक दाखल होत असतात. विशेषतः सर्वसामान्य आणि गरीब वर्गातील भाविक दर्शनासाठी येताना तुळजापूर शहरातील आठवडा बाजार परिसरात थांबतात. मात्र या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुविधा नसल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती.अनेक वेळा महिलांना, वृद्धांना आणि लहान मुलांना पाण्याविना तासन्तास बसावे लागत असल्याचे चित्र वारंवार दिसून येत होते.या पार्श्वभूमीवर युवा उद्योजक व देवीचे पुजारी श्री राहुल तानाजी भोसले यांनी भाविकांच्या अडचणीची दखल घेत आठवडा बाजार परिसरात मोफत पाण्याच्या टँकरची सुविधा उपलब्ध करून दिली.
या उपक्रमामुळे आठवडा बाजारात थांबणाऱ्या गरीब आणि सर्वसामान्य भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाण्यासाठी भटकंती, पैसे खर्च करणे किंवा पाण्याच्या बाटल्यांसाठी लांब रांगा या त्रासातून भाविकांची सुटका झाली आहे.मोफत टँकर सुविधा सुरू झाल्यानंतर अनेक भाविकांनी “देवीच्या नगरीत आज माणुसकीचं दर्शन झालं” अशा भावना व्यक्त केल्या. विशेषतः वृद्ध, महिला आणि लहान मुलांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयोगी ठरत आहे.
सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव
राहुल भोसले यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे शहरातील सामाजिक, धार्मिक तसेच नागरिक स्तरातून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. “फक्त दर्शन व्यवस्था नाही तर भाविकांच्या मूलभूत गरजांचीही काळजी घेतली पाहिजे” हा संदेश या उपक्रमातून दिला गेला आहे.
तुळजापूरसाठी प्रेरणादायी उपक्रमदेवीच्या नगरीत भाविकांसाठी सुविधा उभारणे ही जबाबदारी सर्वांचीच आहे.

0
7
6
4
9
9



