Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

मोडी लिपी वाचन प्रशिक्षण परीक्षेत अक्षय साळुंखे यांचा चमकदार यशस्वी ठसा

मोडी लिपी वाचन प्रशिक्षण परीक्षेत अक्षय साळुंखे यांचा चमकदार यशस्वी ठसा

0 7 6 4 9 6

मोडी लिपी वाचन प्रशिक्षण परीक्षेत अक्षय साळुंखे यांचा चमकदार यशस्वी ठसा

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख विभागाच्या मार्फत जुळे सोलापूर येथील वि. गु. शिवदारे महाविद्यालयाच्या इतिहास विभागात नुकतेच दहा दिवसांचे मोडी लिपी वाचन प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात राज्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक तसेच इतिहास अभ्यासकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला होता.

या प्रशिक्षणानंतर घेण्यात आलेल्या परीक्षेत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे सहायक स्वच्छता निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले अक्षय शहाजी साळुंखे यांनी उत्कृष्ट गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे तुळजापूरसह मित्रपरिवार व सहकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अक्षय साळुंखे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील असून, गेल्या वर्षभरापासून ते श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात कार्यरत आहेत. दैनंदिन कामाचा व्याप सांभाळत त्यांनी मोडी लिपीचे वाचन व लेखन या प्राचीन लिपीत प्रावीण्य मिळवले आहे.

मोडी लिपी ही महाराष्ट्राची ऐतिहासिक लिपी मानली जाते. १३व्या शतकापासून ते १९६० पर्यंत प्रशासन, न्याय, करप्रणाली आणि व्यापार व्यवहार यांसारख्या असंख्य दस्तऐवजांमध्ये ही लिपी वापरली जात होती. इतिहास संशोधनात आजही मोडी लिपीचे विशेष स्थान आहे.

या प्रशिक्षणाद्वारे अक्षय साळुंखे यांनी इतिहास संवर्धन आणि अभ्यासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. त्यांच्या या यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार तसेच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकारी व सहकारी यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे