ब्रेकिंगमहाराष्ट्र
पदवीधरांच्या हक्कांसाठी डॉ. प्रतापसिंह पाटील मैदानात!
रोजगार, शिक्षकांचे प्रश्न आणि शैक्षणिक धोरणांवर भर; छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात प्रचाराला वेग

0
8
5
6
3
1
पदवीधरांच्या हक्कांसाठी डॉ. प्रतापसिंह पाटील मैदानात!
रोजगार, शिक्षकांचे प्रश्न आणि शैक्षणिक धोरणांवर भर; छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात प्रचाराला वेग
छत्रपती संभाजीनगर : तुळजापूर नामा
पदवीधरांचे प्रश्न, सुशिक्षित बेरोजगारांच्या रोजगाराची चिंता, शिक्षक-प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्या आणि शिक्षण क्षेत्रातील अडचणी या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात प्रचाराला वेग दिला आहे. विविध भागांत पदवीधर मतदारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर प्रचारात भर दिला जात आहे.

पदवीधरांच्या प्रश्नांचा आवाज बुलंद करण्याचा निर्धार
पदवीधरांच्या हक्कांचे प्रश्न आणि तरुणांच्या रोजगाराचा मुद्दा विधिमंडळात प्रभावीपणे मांडण्याची गरज असल्याचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी प्रचारादरम्यान सांगितले. केवळ समस्या मांडण्यापुरते मर्यादित न राहता त्यावर उपाययोजनांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा आपला उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रचार मोहिमेदरम्यान महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते गावोगावी, शहरांमध्ये, महाविद्यालयांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये पदवीधर मतदारांच्या भेटी घेत आहेत. बैठका, कोपरा सभा आणि पदयात्रांच्या माध्यमातून उमेदवाराची भूमिका तसेच पदवीधरांशी संबंधित मुद्दे मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कार्यकर्त्यांकडून प्रचाराचे नियोजन
या प्रचार मोहिमेत विक्रांत नवले, हाके सर, प्रशांत कोरके, नितिन शेरखाने, केदार सर आणि अजिंक्य किरदत यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. पदवीधर मतदारांशी संवाद साधून डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या उमेदवारीची भूमिका मांडली जात आहे.
प्रचारादरम्यान पदवीधरांचे प्रश्न, रोजगाराच्या संधी, शिक्षक-प्राध्यापकांच्या मागण्या आणि शैक्षणिक धोरणांतील त्रुटी हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहेत. कार्यकर्त्यांकडून डॉ. पाटील यांना पहिल्या पसंतीचे मत देण्याचे आवाहन केले जात आहे.
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातील प्रचाराला वेग आला असून, आगामी काळात पदवीधरांच्या प्रश्नांवर कोणते मुद्दे अधिक प्रभावी ठरतात आणि मतदारांचा प्रतिसाद कसा राहतो, याकडे लक्ष लागले आहे.
0
8
5
6
3
1



