Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

भाजप तुळजापूर तालुक्यात नवनियुक्त पंचायत समिती सदस्यांचा सत्कार

भाजप तुळजापूर तालुक्यात नवनियुक्त पंचायत समिती सदस्यांचा सत्कार

0 7 6 4 9 6

तुळजापूर : भारतीय जनता पार्टी तुळजापूर तालुक्याच्या वतीने नवनियुक्त पंचायत समिती सदस्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष मा.श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या शुभहस्ते नवनियुक्त सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मा.श्री. विनोद पिटू गंगणे होते.या वेळी बोलताना जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी, पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला गती देण्याची जबाबदारी नवनियुक्त सदस्यांवर असून, जनतेच्या विश्वासाला पात्र ठरतील असे काम करावे, असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी पक्ष संघटना अधिक बळकट करून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध राहण्याचे सांगितले.कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कार सोहळ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

https://www.facebook.com/share/v/17BQ2vpeL2/

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे