ब्रेकिंगमहाराष्ट्र
रात्री १० नंतर तुळजापूर शहरात एकही हॉटेल सुरू दिसणार नाही; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांचे हॉटेल चालकांना आवाहन

0
8
5
6
2
6
रात्री १० नंतर तुळजापूर शहरात एकही हॉटेल सुरू दिसणार नाही; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांचे हॉटेल चालकांना आवाहन
तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहर व परिसरातील हॉटेल चालकांनी रात्री १० नंतर आपली आस्थापने सुरू ठेवू नयेत, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी दिला आहे.शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि वरिष्ठांच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहरातील सर्व हॉटेल चालकांना नियमांचे पालन करण्याबाबत तंबी देण्यात आली असून, रात्री १० नंतर हॉटेल सुरू ठेवू नयेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांच्या आदेशानुसार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी नियमभंग करणाऱ्या हॉटेल चालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उचलण्याचा इशारा दिला आहे.
रात्री १० नंतर शहरात एकही हॉटेल सुरू दिसणार नाही, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी दैनिक नवराष्ट्रशी बोलताना सांगितलं
तुळजापूर हे तीर्थ क्षेत्र असल्याने दररोज हजारो भाविक आई भवानीच्या दर्शनासाठी येतात यांची तुळजापूर शहराच्या चहुबाजूनी भावीक भक्तांची लुटमार होणार नाही किंवा भाविक शहरात दाखल झाल्यानंतर गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतेच हा निर्णय घेतलेला आहे.आमचे पोलीस प्रशासन तैनात करण्यात आलेले आहे
0
8
5
6
2
6



