Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

विद्यार्थी काॅंग्रेस च्या महाराष्ट्र सचिव पदी ॲड. श्रीराम हंगरगेकर यांची निवड

विद्यार्थी काॅंग्रेस च्या महाराष्ट्र सचिव पदी ॲड. श्रीराम हंगरगेकर यांची निवड

0 7 6 4 9 6

विद्यार्थी काॅंग्रेस च्या महाराष्ट्र सचिव पदी ॲड. श्रीराम हंगरगेकर यांची निवड

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देविचे पुजारी आणि पुणे येथिल आय एल एस लॉ कॉलेजचे विद्यार्थी असलेले ॲड.श्रीराम अशोकराव हंगरगेकर यांची राष्ट्रीय विद्यार्थी संघ भारत विद्यार्थी कॉग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली आहे.

ॲड.श्रीराम हंगरगेकर यांनी पुणे येथे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणा-या विद्रयार्थींच्या विविध मागण्यासाठी प्रत्येक्ष रस्याष्वर उतरून आंदोलन करत लढा उभारला होता.तसेच शेतक-यांच्या न्याय हक्कांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे. शैक्षणिक, सामाजिक प्रश्नांवर आंदोलन करून लढे उभारले आहे. समाज हिताच्या न्यायीक कामाची पोहच म्हणून ही नियुक्ती करण्यात आली आहे.
ॲड. श्रीराम हंगरगेकर हे तुळजापूर चे माजी आमदार कै. साहेबराव हंगरगेकर यांचे नातू आहेत.दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की राष्ट्रीय विद्यार्थी संघ भारतचे राष्ट्रीय प्रभारी कन्हैया कुमार,राष्ट्रीय अध्यक्ष वरुण चौघरी यांच्या मान्यतेने, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय विद्यार्थी संघ भारतच्या प्रदेश सचिवांची नियुक्ती जाहीर करण्यात येत आहे. नियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा असे नमूद केले आहे.नियुक्ती पत्रावर राष्ट्रीय विद्यार्थी संघ भारतचे राष्ट्रीय सचिव महाराष्ट्र प्रभारी अक्षय यादव क्रांतीवीर, महाराष्ट्र प्रभारी क्रांता ग्वाला, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सागर साळुंके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे