वरुडाजवळ १.११ लाखांचा अवैध दारू साठा जप्त! धाराशिव ग्रामीण पोलिसांची कारवाई — दोन आरोपी ताब्यात
वरुडाजवळ १.११ लाखांचा अवैध दारू साठा जप्त! धाराशिव ग्रामीण पोलिसांची कारवाई — दोन आरोपी ताब्यात
वरुडाजवळ १.११ लाखांचा अवैध दारू साठा जप्त!
धाराशिव ग्रामीण पोलिसांची कारवाई — दोन आरोपी ताब्यात
धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध दारूविक्रीविरोधात कारवाई करत वरुडाजवळून तब्बल ₹१,११,६१० किमतीचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अलंकार दत्ता रोहीदास (वय ४०) आणि मकबुल आब्बु मुलानी (वय ५५, रा. तेर, ता. व जि. धाराशिव) हे दोघे दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ७.४५ वा. वरुडा येथे जिल्हा परिषद शाळेच्या समोरून जाणाऱ्या वरुडा-तेर रस्त्यावर अल्टो कार (किंमत ₹३१,६१०) मध्ये एकूण १३० देशी-विदेशी दारूच्या सिलबंद बाटल्या विक्रीसाठी वाहून नेत होते.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी हा एकूण ₹१,११,६१० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींकडून दारूचा साठा विक्रीच्या उद्देशाने बाळगण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे.या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.धाराशिव ग्रामीण पोलिसांची दक्ष व तत्पर कारवाई!



