ब्रेकिंगमहाराष्ट्र
कोचिंग क्लासेस फेडरेशनच्या राज्य संघटकपदी अप्पासाहेब सुरवसे!
मराठवाडा विभागाची जबाबदारी; जून २०२९ पर्यंत नियुक्ती, शैक्षणिक व संघटनात्मक क्षेत्रातील कार्याची दखल

0
8
5
6
2
9
कोचिंग क्लासेस फेडरेशनच्या राज्य संघटकपदी अप्पासाहेब सुरवसे!
मराठवाडा विभागाची जबाबदारी; जून २०२९ पर्यंत नियुक्ती, शैक्षणिक व संघटनात्मक क्षेत्रातील कार्याची दखल
तुळजापूर,: तुळजापूरनामा
कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन अँड सोशल फोरम, महाराष्ट्र या संघटनेच्या मराठवाडा विभागाच्या राज्य संघटकपदी तुळजापूर येथील आदित्य कोचिंग क्लासेसचे संचालक अप्पासाहेब गजेंद्र सुरवसे यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेने दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी नियुक्तीपत्र देत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.
सुरवसे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून कोचिंग क्लासेस तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि कोचिंग क्लासेस व्यावसायिकांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने योगदान दिल्याने त्यांच्या अनुभवाची, संघटन कौशल्याची, सामाजिक बांधिलकीची आणि नेतृत्वगुणांची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आल्याचे संघटनेने नियुक्तीपत्रात नमूद केले आहे.
जून २०२९ पर्यंतचा कार्यकाळ असलेल्या या जबाबदारीत संघटनेची ध्येय-धोरणे, घटनात्मक मूल्ये व शिस्त यांचा सन्मान राखत पदाधिकारी, शिक्षक, क्लासेस संचालक आणि सभासद यांच्यात संवाद व समन्वय वाढविण्याचे आवाहन त्यांना करण्यात आले आहे.
“पद हे व्यक्तीचे मोठेपण सिद्ध करण्यासाठी नसते, तर आपल्या कार्यातून त्या पदाला मोठेपण मिळवून देण्यासाठी असते,” या कार्यभावनेतून निष्ठेने, पारदर्शकतेने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून काम करण्याची अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.

दरम्यान, अप्पासाहेब सुरवसे यांच्या नियुक्तीबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि कोचिंग क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.
0
8
5
6
2
9



