Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

जिल्हा परिषद निवडणूक २०२६ : केशेगाव गटातून संजिवनीताई इच्छुक; सरपंच अभिजित पाटील यांचा पुढाकार

0 7 6 5 0 5

जिल्हा परिषद निवडणूक २०२६ : केशेगाव गटातून संजिवनीताई इच्छुक; सरपंच अभिजित पाटील यांचा पुढाकार

केशेगाव | प्रतिनिधी

आगामी जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर केशेगाव गटातून संजिवनीताई यांनी इच्छुक उमेदवार म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या नेतृत्वाच्या साथीने त्यांनी जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली असून, गावागावातून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सर्वसामान्य लोकांचं असामान्य नेतृत्व अशी ओळख निर्माण केलेल्या मार्गदर्शनाखाली आणि सरपंच अभिजित पाटील यांच्या पुढाकारातून केशेगाव गटात विकासात्मक राजकारणाची नवी दिशा मिळेल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण तसेच महिला सक्षमीकरण या महत्त्वाच्या मुद्द्यांना प्राधान्य देत संजिवनीताई यांनी आपला विकास आराखडा मांडण्यास सुरुवात केली आहे. केशेगाव
गटातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणे व त्यावर प्रभावी उपाययोजना करणे हेच आपले ध्येय असल्याचे संजिवनीताई अभिजित पाटील यांनी सांगितले. आगामी निवडणुकीत केशेगाव गटात चुरशीची लढत होणार असून, सर्वसामान्यांच्या पाठिंब्याने आपण निश्चित यशस्वी होऊ, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे