ब्रेकिंगमहाराष्ट्र
कुरनूर धरणात केवळ १२ टक्के पाणीसाठा; तुळजापूरच्या पाणीपुरवठ्यावर संकट
एक दिवसाआडऐवजी दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव; नगर परिषदेकडून परिस्थितीचा आढावा
0
8
5
6
2
9
कुरनूर धरणात केवळ १२ टक्के पाणीसाठा; तुळजापूरच्या पाणीपुरवठ्यावर संकट
एक दिवसाआडऐवजी दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव; नगर परिषदेकडून परिस्थितीचा आढावा
तुळजापूर, : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कुरनूर (बोरी) प्रकल्पात केवळ १२ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने आगामी काळात शहराच्या पाणीपुरवठ्यावर संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर लोकनियुक्त नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा सभापती सागर कदम, नगरसेवक मधुकर शेळके, पाणीपुरवठा प्रमुख महादेव शिंदे तसेच संबंधित कर्मचाऱ्यांनी धरण परिसराची पाहणी करून उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला.सध्याची परिस्थिती लक्षात घेता शहरातील पाणीपुरवठा नियोजनबद्ध पद्धतीने करण्यासाठी एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा दोन दिवसाआड करण्याचा प्रस्ताव नगराध्यक्षांसमोर मांडण्यात आला आहे. पावसाळा अपेक्षित प्रमाणात न झाल्यास पुढील काही महिन्यांत पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने आतापासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.दरम्यान, नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाणी वाया घालवू नये तसेच नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन संबंधित पदाधिकाऱ्यांनी केले आहे. अंतिम निर्णय नगर परिषद प्रशासनाच्या बैठकीत घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कुरनूर धरणातील पाणीसाठा धोक्याच्या पातळीवर
◾शिल्लक पाणीसाठा : १२ टक्के
◾शहराला पाणीपुरवठा करणारा प्रमुख स्रोत
◾दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव
◾नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन
◾नगर परिषदेकडून परिस्थितीवर लक्ष ठेवून नियोजन सुरू.

0
8
5
6
2
9



