ब्रेकिंगमहाराष्ट्र
पॉक्सो प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पॉक्सो प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

0
7
6
4
9
6
पॉक्सो प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
धाराशिव : पॉक्सो प्रकरणातील गंभीर आरोपांमध्ये अडकलेल्या आरोपीची विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या निर्णयामुळे प्रकरणाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे.प्रकरण क्रमांक स्पेशल केस नं. ६७/२०२३ (सरकार विरुद्ध रोहित खंदारे, गुन्हा नोंद क्र. २७०/२०२३) अंतर्गत कलम ३६३, ३६६-अ, ३७६(२)(न), ३७६(२)(ज), ३७६(३) भा.द.वि. तसेच कलम ४, ८, १२ ‘द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्स अॅक्ट, २०१२’ अंतर्गत आरोप ठेवण्यात आले होते.
या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी प्रभावी युक्तिवाद सादर करत सरकार पक्षाच्या साक्षीदारांचा कसून उलटतपास केला. उलटतपासादरम्यान आरोपीने कोणताही गुन्हा केला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच सरकार पक्षाने तपासलेले साक्षीदारही त्यांच्या बाजूला समर्थन देऊ शकले नाहीत, ही बाबही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.सरकार पक्ष आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचा ठोस युक्तिवाद ॲड. साखरे यांनी केला. तसेच सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे विविध न्यायनिर्णय सादर करून आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध होत नसल्याची बाजू भक्कमपणे मांडली.
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद व सादर पुरावे विचारात घेऊन विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश धाराशिव मा.न्यायाधीश औटी साहेब यांनी सबळ पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.या प्रकरणात ॲड. विशाल साखरे यांना ॲड. मंजुषा साखरे, ॲड. महेश लोहार, ॲड. शुभम तांबे, ॲड. अमित गोळे, ॲड. संकेत गोरे, ॲड. लक्ष्मीकांत कुलकर्णी, ॲड. अर्चना कांबळे, ॲड. ओंकार कोरेगावकर, ॲड. रोहित लोमटे, पृथ्वीराज खोचरे व महेश पवार यांनी सहकार्य केले.
0
7
6
4
9
6



