ब्रेकिंगमहाराष्ट्र
मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये नूतन नगरसेविकांचा सत्कार व पालक मेळावा उत्साहात

0
7
6
4
9
7
मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये नूतन नगरसेविकांचा सत्कार व पालक मेळावा उत्साहात
तुळजापूर | प्रतिनिधी
तुळजापूर येथील मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये पालक मेळावा, नूतन नगरसेविकांचा सत्कार तसेच हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थाध्यक्ष किरण पुजारी, मुख्याध्यापिका विशाखा पाटील व सहकाऱ्यांच्या वतीने उपस्थित पालकांचे स्वागत करण्यात आले.
या मेळाव्यास विद्यार्थ्यांच्या मातांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला होता. यावेळी पालकांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच नूतन नगरसेविका जयश्री कंदले, अश्विनी रोचकरी, मंजुषा देशमाने, नीता क्षिरसागर, डॉ. प्रगती कदम, श्वेता साळुंके, महंताबाई साठे, सरोजा अमृतराव, प्रियांका गंगणे, ज्योती सावंत, सुप्रिया गवळी व प्रियंका रोचकरी यांचा शाळेच्या वतीने फेटा बांधून, शाल, हार व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी उपस्थित पालक महिलांना शाळेतील शिक्षिकांच्या वतीने हळदीकुंकू देण्यात आले तसेच भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. संस्थाध्यक्ष किरण पुजारी व मुख्याध्यापिका विशाखा पाटील यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन करत संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील कर्मचारी आदित्य खुरूड व शिक्षिकांनी विशेष परिश्रम घेतले. पालक मेळावा उत्साही व सकारात्मक वातावरणात यशस्वीरित्या पार पडला.
0
7
6
4
9
7



