तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचा उत्पत्ती दिन (प्रकट दिन) तुळजापूर येथे मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त मातेच्या चरणी अभिषेक पूजा व महाआरतीचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या हस्ते श्री तुळजाभवानी मातेस अभिषेक व महाआरती करण्यात आली. यावेळी जनकल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. तसेच महाद्वारासमोर भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करून हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य महंत वाकोजी बुवा, तहसीलदार तथा व्यवस्थापक माया माने मॅडम, धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले, नागेश नाईक, किशोर गंगणे, पत्रकार गोविंद खुरुद, नागेश शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच शिवाजी बोधले, इंद्रजीत साळुंके, पुजारी बाळासाहेब भोसले, सागर इंगळे, दिगंबर खुंटाफळे, किरण कदम, नितिन जट्टे, बाळू साठे, विशाल शेटे, बापूसाहेब करडे, श्रीकृष्ण साळुंके, प्रसाद पानपुडे, शुभम क्षीरसागर, ओंकार टोले यांच्यासह पुजारी बांधव, व्यापारी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला असून भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदविला.
https://youtu.be/H6iqRwOMHvQ?si=uuqCSWk4_Z181LxP