Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

हायमास्ट लाईटमध्ये करंट; तत्काळ दुरुस्तीमुळे मोठा अनर्थ टळला!

हायमास्ट लाईटमध्ये करंट; तत्काळ दुरुस्तीमुळे मोठा अनर्थ टळला!

0 7 6 5 2 0

हायमास्ट लाईटमध्ये करंट; तत्काळ दुरुस्तीमुळे मोठा अनर्थ टळला!

तुळजापूर : शहरातील कमान वेस डुल्या मारुती मंदिरासमोरील हायमास्ट लाईटमध्ये वायर शॉर्टसर्किट होऊन संपूर्ण हायमास्टमध्ये करंट उतरल्याची धक्कादायक घटना समोर आली. सुदैवाने, प्रशासनाच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अपघात टळला.मिळालेल्या माहितीनुसार, हायमास्ट लाईटच्या वायरिंगमध्ये अचानक बिघाड होऊन करंट उतरला होता.

ही बाब लक्षात येताच तात्काळ यंत्रणा सक्रिय झाली. आदरणीय आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगराध्यक्ष विनोद गंगणे व मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या सूचनेनुसार नगरपरिषदेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. माजी नगरसेवक अबरीश जाधव, दादासाहेब खपले, राजेश्वर कदम यांच्यासह नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून हायमास्ट लाईटची संपूर्ण वायरिंग तपासली. आवश्यक दुरुस्ती तातडीने करण्यात आली.

या जलद कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने घेतलेल्या तत्पर भूमिकेचे कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे