Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

अवकाळी पाऊस-गारपिटीचा जिल्ह्यात हाहाकार; वीज पडून एकाचा मृत्यू, सतर्क राहण्याचे आवाहन

अवकाळी पाऊस-गारपिटीचा जिल्ह्यात हाहाकार; वीज पडून एकाचा मृत्यू, सतर्क राहण्याचे आवाहन

0 7 6 5 0 5

अवकाळी पाऊस-गारपिटीचा जिल्ह्यात हाहाकार; वीज पडून एकाचा मृत्यू, सतर्क राहण्याचे आवाहन

तुळजापूर : जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे हाहाकार उडाला आहे. या नैसर्गिक आपत्तीत वीज पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्याने शेतीपिके व मालमत्तेचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने तत्काळ हालचाली सुरू केल्या आहेत. ज्या भागांत नुकसान झाले आहे, त्या ठिकाणी उद्या सकाळपासून पंचनामे करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले असून नुकसानीचा आढावा घेऊन शासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे.दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही दिवसांत पुन्हा वादळी वारे, जोरदार पाऊस व गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे व आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, आपत्तीच्या काळात स्वतःची व कुटुंबाची काळजी घेण्याचे आवर्जून सांगितले आहे.
नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी जागरूक राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे