Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपीस जामीन; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय

प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपीस जामीन; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय

0 8 5 6 2 6

प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपीस जामीन; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय

तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर शहरातील जुन्या कन्या प्रशाला परिसरात युवकावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या निर्णयानंतर शहरात या बहुचर्चित प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
दि. ५ जून २०२६ रोजी मध्यरात्री जुन्या कन्या प्रशाला परिसरात एका युवकावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले होते. डोक्यावर वार होत असताना संबंधित युवकाने तो वार हातावर घेतल्याने त्याच्या हाताच्या शिरा पूर्णपणे तुटल्या. तसेच मारहाणीत उजव्या पायाच्या गुडघ्यावर, नडगीवर, डोक्यावर व डाव्या डोळ्याखाली गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या. जखमी युवकास रक्ताच्या थारोळ्यातून सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात अमोल कोरडे, ज्योतीराम जाधव, अनुज कोरडे व मनोज कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक २२५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(३) व ३(५) अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा घडल्यानंतर अमोल कोरडे व ज्योतीराम जाधव हे सुमारे एक महिना फरार होते. पोलिसांनी शोधमोहीम राबवत १० जून २०२६ रोजी दोघांना अटक केली होती.
फरार आरोपींच्या वतीने ॲड. विराज विलासराव जगदाळे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात बाजू मांडत सविस्तर युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने बचाव पक्षाचा मुद्दा ग्राह्य धरत आरोपीस जामीन मंजूर केला.
या प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. संजय पवार यांचे मार्गदर्शन, तर ॲड. ओंकार मस्के यांचे सहकार्य लाभल्याचे बचाव पक्षाकडून सांगण्यात आले.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे