Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

यशवंतराव चव्हाण परीक्षा केंद्राला पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांची भेट

यशवंतराव चव्हाण परीक्षा केंद्राला पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांची भेट

0 7 6 5 2 0

यशवंतराव चव्हाण परीक्षा केंद्राला पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांची भेट

तुळजापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूर यांच्या वतीने घेण्यात येत असलेल्या फेब्रुवारी २०२६ च्या बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राला तुळजापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी भेट दिली. यावेळी परीक्षा केंद्राच्या परिसराची पाहणी करून कोणताही अनुचित प्रकार आढळून न आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.जीवशास्त्र विषयाच्या सकाळच्या सत्रातील परीक्षेसाठी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्यासह पोलीस अंमलदार अमोल पवार यांनीही परीक्षा केंद्रास भेट दिली. संपूर्ण परीक्षा प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे पालकवर्गातूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हासदादा बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य डॉ. प्रवीण भाले, उपप्राचार्य प्रा. रमेश नन्नवरे, केंद्र संचालक प्रा. पद्माकर राव, प्रा. राजेंद्र खेंदाड, प्रा. दत्तात्रय देवगुंडे, डॉ. अमोद जोशी, डॉ. सतीश महामुनी, प्रा. सुलभा कोरेकर तसेच इतर कर्मचारी परीक्षा समितीमध्ये कार्यरत असून परीक्षेचे कामकाज सुरळीतपणे पार पाडले जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे