गुन्हेगारीदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र
बहुचर्चित मिलन लॉज प्रकरणात आरोपीस तात्काळ जामीन
बांगलादेशी महिलांचा समावेश असलेल्या पिटा कायद्यातील कारवाईनंतर जिल्हा न्यायालयाचा निर्णय

0
7
6
5
0
5
बहुचर्चित मिलन लॉज प्रकरणात आरोपीस तात्काळ जामीन
बांगलादेशी महिलांचा समावेश असलेल्या पिटा कायद्यातील कारवाईनंतर जिल्हा न्यायालयाचा निर्णय
तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहुचर्चित मिलन लॉज प्रकरणात आरोपी क्रमांक २ तथा हॉटेल मालक संतोष पवार यास जिल्हा व सत्र न्यायालयाने तात्काळ नियमित जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी बाजू मांडली.धाराशिव येथील Prevention of Immoral Traffic विभागामार्फत तामलवाडी येथील मिलन लॉजवर छापा टाकण्यात आला होता. त्या कारवाईदरम्यान दोन बांगलादेशी महिला व महाराष्ट्रातील एका तरुणीकडून देहविक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली होती.
या प्रकरणात तामलवाडी पोलीस ठाण्यात पिटा कायद्यासह भारतीय न्यायसंहिता कलम 143, 144 अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात हॉटेल मालक तसेच हॉटेल भाडेतत्त्वावर देणाऱ्या व्यक्तीचा समावेश करण्यात आला होता.
जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी आरोपी क्रमांक २ हा केवळ हॉटेल खरेदी करारनाम्यातील व्यक्ती असून, इसार रक्कम देऊन हॉटेलच्या दुरुस्तीचे काम करत असल्याचा युक्तिवाद केला. हॉटेलमध्ये घडणाऱ्या कथित प्रकारांबाबत आरोपीस कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी न्यायालयासमोर नमूद केले.तसेच, पोलिसांनी नमूद केलेल्या दोन बांगलादेशी महिलांशी आरोपी क्रमांक २ याचा कोणताही संबंध नसल्याचा दावा करण्यात आला. त्या महिला कोठून आल्या, त्यांना कोणी आणले, याबाबत आरोपीविरोधात प्रथमदर्शनी कोणताही पुरावा पोलिस तपासात निष्पन्न झालेला नसल्याचा युक्तिवादही बचाव पक्षाने केला.“Bail is rule and jail is exceptional” या न्यायसिद्धांताचा आधार घेत आरोपीस केवळ आरोपांच्या आधारे कारागृहात ठेवणे योग्य नसल्याचे ॲड. साखरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय जिल्हा न्यायाधीश श्री. ठुबे यांनी आरोपी क्रमांक २ याचा नियमित जामीन अर्ज मंजूर केला.सदर प्रकरणात ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांना ॲड. मंजुषा साखरे, ॲड. महेश लोहार, ॲड. शुभम तांबे, ॲड. अमित गोळे, ॲड. अर्चना कांबळे, ॲड. योगेश कुलकर्णी, ॲड. ओंकार कोरेगावकर, ॲड. संकेत गोरे, ॲड. रोहित लोमटे व ॲड. पृथ्वीराज खोचरे यांनी सहकार्य केले.
0
7
6
5
0
5



