ब्रेकिंगमहाराष्ट्र
पोक्सो प्रकरणातील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
पोक्सो प्रकरणातील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

0
8
5
6
3
1
पोक्सो प्रकरणातील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
कळंब | प्रतिनिधी
कळंब पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पोक्सो व अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालय, कळंब यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६२/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS-2023) कलम ६४(१), ४९, ३(५) तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४, ५(एम) व ६ अन्वये अल्पवयीन पीडितेवरील जबरदस्तीच्या बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्याद दाखल झाल्यानंतर आरोपी रवी दत्ता पवार यांच्या वतीने ॲड. विशाल साखरे यांनी जिल्हा व सत्र न्यायालय, कळंब येथे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला.
जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान बचाव पक्षातर्फे ॲड. विशाल साखरे यांनी सविस्तर युक्तिवाद केला. प्रथम माहिती अहवालात आरोपीचे नाव नसल्याचा, आरोपीचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नसल्याचा तसेच आरोपीविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा त्यांनी न्यायालयासमोर मांडला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय जिल्हा न्यायाधीश श्री. व्ही. के. मांडे यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.
या प्रकरणात ॲड. विशाल साखरे यांना ॲड. अमित गोळे, ॲड. मंजुषा साखरे, ॲड. महेश लोहार, ॲड. शुभम तांबे, ॲड. अर्चना कांबळे, ॲड. लक्ष्मीकांत कुलकर्णी, ॲड. संकेत गोरे, ॲड. ओंकार कोरेगावकर, ॲड. रोहित लोमटे, ॲड. पृथ्वीराज खोचरे आणि ॲड. महेश पवार यांनी सहकार्य केले.
0
8
5
6
3
1



