अवैध तंबाखू,पानमसाला व सिगारेट विक्रीप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
अवैध तंबाखू,पानमसाला व सिगारेट विक्रीप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
अवैध तंबाखू,पानमसाला व सिगारेट विक्रीप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
तामलवाडी : प्रतिनिधी
अवैधरीत्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यासाठी माल जवळ बाळगणाऱ्या एका व्यक्तीविरोधात तामलवाडी पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, मल्लिनाथ तिपन्ना कोळी (वय ४२ वर्षे, रा. उलेगाव द. सोलापूर, जि. सोलापूर) हे दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ७.२० वाजता सोलापूर–तुळजापूर रोडवरील टोलनाक्याजवळील शिवनेरी हॉटेलच्या बाजूस तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी थांबलेले असताना तामलवाडी पोलिसांच्या नजरेस आले.
पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपीकडे केसरयुक्त विमल पानमसाला व इतर तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण रु ४८० किंमतीचा माल आढळून आला. हा माल विक्रीसाठी बाळगण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तो जप्त केला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ (जाहिराती व वाणिज्य, उत्पादन, पुरवठा व वितरण) प्रतिबंध अधिनियम, २००३ अंतर्गत कलम ६(अ) व २४ नुसार तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील तपास तामलवाडी पोलीस करत आहेत.



