Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

उलट्या बोंबांचा खरा अर्थ : खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटीलांनाच घरचा आहेर – ॲड विशाल साखरे

गोव्हाटीवरून टोकन घेऊन परतले भकास आमदार कैलास पाटील!

0 7 6 4 9 7

उलट्या बोंबांचा खरा अर्थ : खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटीलांनाच घरचा आहेर – ॲड विशाल साखरे

धाराशिव : प्रतिनिधी

धाराशिवच्या राजकारणात सध्या “उलट्या बोंबा” या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. शिवसेना (उबाटा) गटाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी केलेल्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) जिल्हा प्रवक्ते ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी सडेतोड प्रत्युत्तर देत “उलट्या बोंबा” म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्याच उलट्या बोंबा आहेत! असा जोरदार हल्ला चढवला आहे.ॲड. साखरे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, खासदार आणि आमदार यांच्या नाकर्तेपणामुळे एका निष्पाप मुलाचा जीव गेला, हे विसरू नये. या प्रकरणी दोघांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता. त्यांनी जबाबदारी टाळत स्वतःचं अपयश लपवण्याचा प्रयत्न केला आहे.

ॲड साखरे पुढे म्हणाले, उलट्या बोंबा सत्य आहेत, पण चोर कोण हे जनतेला माहीत आहे! धाराशिव नगर पालिकेमधला भंगार चोर कोण? आणि तेरणा कारखान्याचा भंगार चोर कोण? या प्रश्नांची उत्तरं त्यांनी आधी द्यावीत.ॲड साखरे यांनी पुढे स्पष्ट केलं की — शहरातील विकास निधीचा पाठपुरावा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केला, हे निर्विवाद सत्य आहे. मात्र, त्यावर आपलं नाव कोरण्याचा प्रयत्न खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील करत आहेत. आता त्यांनी जनतेसमोर येऊन स्पष्ट करावं की, खरंच विकासासाठी झटले ते, की केवळ श्रेय लाटले?

या सडेतोड शब्दात केलेल्या टीकेमुळे धाराशिवच्या राजकारणात पुन्हा एकदा तापमान वाढले आहे.
“उलट्या बोंबा” या शब्दाचा राजकीय अर्थ आता उलटाच झाला असून, जनता विचारत आहे.“खरं कोण,चोर कोण?”

गोव्हाटीवरून टोकन घेऊन परतले भकास आमदार कैलास पाटील!

गोव्हाटी येथे टोकन घेण्यासाठी गेलेले आमदार कैलास पाटील अखेर ट्रकने परत आले. मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी फक्त टोकनपुरते राजकारण करणाऱ्या या भकास आमदारावर टीकेची झोड उठली आहे. कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर, तर जनतेत संतापाची लाट उसळली आहे. असे ही जिल्हा प्रवक्ते ॲड विशाल साखरे यांनी प्रसिद्धी पत्रातून नमूद केल्या आहे.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे