Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूरच्या ऋतुजा जगतापचे एमपीएससीत दैदिप्यमान यश

0 7 6 5 0 5

तुळजापूरच्या ऋतुजा जगतापचे एमपीएससीत दैदिप्यमान यश

तुळजापूर : प्रतिनिधी

नवनिर्मिती प्रेरणा बहुउद्देशीय महिला मंडळ सामाजिक संस्था यांच्या वतीने तुळजापूर येथील नागनाथ जगताप व कविता जगताप यांची सुकन्या ऋतुजा जगताप हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत तांत्रिक सहाय्यक अधिकारी पदासाठी पात्रता संपादन करत दैदिप्यमान यश मिळविले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत तिने हे यश मिळवून तुळजापूरच्या नावलौकिकात भर घातली आहे.

आजच्या काळात मुली कोणत्याही क्षेत्रात कमी नसून प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत असल्याचे हे यश अधोरेखित करते. अशा कर्तृत्ववान लेकीचा सत्कार करताना मनस्वी अभिमान वाटतो, असे उद्गार नवनिर्मिती प्रेरणा बहुउद्देशीय महिला मंडळाच्या अध्यक्षा मिनाताई सोमाजी यांनी काढले. यावेळी संस्थेच्या वतीने ऋतुजा जगतापचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास ऋतुजाची आई कविता जगताप उपस्थित होत्या. तसेच संस्थेच्या सचिव संध्या खुरूड, सुनिता काळे, रूपाली घाडगे, राधा घोगरे, लक्ष्मी राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे