ब्रेकिंगमहाराष्ट्र
धाराशिव मध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

0
7
6
5
0
5
धाराशिव : धाराशिव मध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार धाराशिव हद्दीत आनंदनगर पोलीस ठाणे हद्दीत एका १७ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीला गावातीलच एका तरुणाने “फिरायला नेतो” असे सांगून मोटारसायकलवर बसवले आणि लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही घटना १ जानेवारी रोजी सायंकाळी घडल्याचे सांगण्यात येते.
या घटनेनंतर मुलगी मानसिक धक्क्यात होती. अखेर तिच्या आईने १४ फेब्रुवारी रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.
0
7
6
5
0
5



