ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग ७ मध्ये दुरंगी रणधुमाळी; तरुण नेतृत्वाचा दबदबा!
लोंढे-इंगळे विरुध खपले-जाधव तुफानी,गणित गुंतागुंतीचे;विजय कुणाचा ?
0
7
6
5
2
3
नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग ७ मध्ये दुरंगी रणधुमाळी; तरुण नेतृत्वाचा दबदबा!

लोंढे-इंगळे विरुध खपले-जाधव तुफानी,गणित गुंतागुंतीचे;विजय कुणाचा ?
तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ मध्ये प्रचाराचा वेग आता अक्षरशः कमालीचा वाढला असून “चारही उमेदवार तगडे” अशी सरळसोट परिस्थिती निर्माण झाली आहे. तरुण नेतृत्व, घराघरातील संपर्क मोहीम आणि अनुभवी राजकीय पाठबळामुळे या प्रभागाची लढत दुरंगी रंग घेऊ लागली आहे. पंढरपूर गल्ली, जवाहर गल्ली, कमानवेस, बाबाजी अड्डा परिसरातील एकूण २७७६ मतदार कोणावर विश्वास दाखवणार? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

या प्रभागात अमृता दादासाहेब खपले, सौ. प्रगती गोपाल लोंढे, अंबरीश अशोकराव जाधव, आणि रणजीत चंद्रकांत इंगळे ही चौकडी रणसंग्रामात उतरली आहे. प्रत्येकाकडे स्वतःची ताकद, स्वतःचा गोट आणि स्वतंत्र जनाधार असल्याने मतदारांची पहिली पसंती कोणाला जाणार, यावर स्थानिक राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे.

या चौघांमध्ये इंगळे रणजीत चंद्रकांत यांना अनुभवी नगरसेवक म्हणून विशेष ओळखले जात आहे. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे मजबूत राजकीय पाठबळ, तसेच वर्षानुवर्षे उभारलेला दांडगा जनसंपर्क हा त्यांचा मोठा तुरुपाचा पत्ता मानला जात आहे. प्रभागात इंगळे यांचा संघटित कारभार आणि तडफदार प्रचारामुळे त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे सौ. प्रगती गोपाल लोंढे या तरुणाईचे प्रतिनिधित्व करत असून महिलांच्या प्रश्नांवर त्यांचे विशेष लक्ष आहे. महिलांचा मोठा कौल, युवकांची साथ आणि घराघरातील प्रभावी संपर्क मोहीम यामुळे लोंढे यांची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. प्रभागातील अनेक तरुण गट त्यांच्यासाठी प्रचारात जोमाने उतरले आहेत.
अमृतानुभव खपले आणि अंबरीश जाधव देखील मैदानात तितक्याच जोमाने लढत असून दोघांचाही स्थानिक पातळीवर ठोस जनाधार आहे. त्यामुळे प्रभाग ७ मध्ये चारही उमेदवार तगडे अशी स्थिती कायम आहे.
पण प्रत्यक्षातील वातावरण सांगते-लढत दुरंगी होत चालली आहे… लोंढे,इंगळे -विरुद्ध खपले,जाधव!
मतदारांनी कोणाचा हात धरून प्रभाग क्रमांक ७ चे भवितव्य ठरवायचे ? याचा फैसला २७७६ मतदारांच्या बोटांवर अवलंबून आहे!
0
7
6
5
2
3



