ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
आमदार सुरेश धस यांच्याशी तुळजापूरच्या यात्रा मैदानाबाबत चर्चा?
शिवसेना तुळजापूर तालुकाध्यक्ष अमोल जाधव व नगरसेवक किरण कदम यांची आष्टी येथे सदिच्छा भेट

0
7
6
5
0
5
आमदार सुरेश धस यांच्याशी तुळजापूरच्या यात्रा मैदानाबाबत चर्चा?
शिवसेना तुळजापूर तालुकाध्यक्ष अमोल जाधव व नगरसेवक किरण कदम यांची आष्टी येथे सदिच्छा भेट
आष्टी : प्रतिनिधी
आमदार सुरेश धस यांच्या आष्टी येथील निवासस्थानी शिवसेना तुळजापूर तालुकाध्यक्ष अमोल जाधव व किरण कदम यांनी सदिच्छा भेट घेतली. आमदार धस यांना आई तुळजाभवानी मातेची प्रतिमा व कवळ्याची माळ देऊन सन्मान केला.

या भेटीदरम्यान तुळजापूर शहरातील ऐतिहासिक यात्रा मैदानाच्या जमीन हडप प्रकरणासह विविध स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती आहे.तुळजापूर यात्रा मैदानाच्या चौकशी अहवालास होत असलेल्या दिरंगाईबाबत चिंता व्यक्त करत, या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. तसेच यात्रा मैदानाशी संबंधित नागरिकांच्या अडचणी, विकासात्मक मुद्दे व शहरातील इतर प्रश्नांवरही सकारात्मक संवाद झाला.

ही भेट सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली असून तुळजापूरच्या हितासाठी सर्व संबंधित विषयांवर समन्वयाने पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.

0
7
6
5
0
5



