Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तामलवाडीत सुयोग फाऊंडेशनचे स्नेहसंमेलन उत्साहात

महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0 7 6 4 9 6

तामलवाडीत सुयोग फाऊंडेशनचे स्नेहसंमेलन उत्साहात ; महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

तामलवाडी : तामलवाडी येथे सुयोग फाऊंडेशनच्या वतीने २६ वे स्नेहसंमेलन तसेच महिला दिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमात विविध सांस्कृतिक उपक्रम, स्पर्धा आणि मार्गदर्शनपर संवादामुळे महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या सचिव डॉ. राजलक्ष्मी गायकवाड यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी त्यांनी उपस्थित तामलवाडीतील महिला भगिनींचे आभार मानत सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. “गेल्या पाच-सहा वर्षांपासून मी साखर कारखानदारी क्षेत्रात कार्यरत असले तरी तामलवाडीशी असलेले २५ वर्षांचे नाते आजही तितकेच घट्ट आहे,” असे सांगत त्यांनी गावातील महिलांना एकत्रितपणे सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच डॉ. रविराज गायकवाड यांच्या कार्याला सहकार्य करण्याचेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमाला सौंदर्यतज्ञ डॉ. जयसुधा कोठा आणि आहारतज्ञ डॉ. श्रद्धा पवार या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी महिलांच्या आरोग्य, सौंदर्य आणि संतुलित आहाराविषयी मार्गदर्शन केले.
या स्नेहसंमेलनात बाल संस्कार केंद्रातील मुलांनी विविध कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर किशोरवयीन मुलींची प्रेरणादायी भाषणे झाली. कार्यक्रमात शालेय मुलींसाठी दोरीउड्या स्पर्धा, महाविद्यालयीन युवतींसाठी वेशभूषा स्पर्धा, सौभाग्यवतींसाठी केशरचना स्पर्धा तसेच सर्व महिलांसाठी विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धांमधील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनश्री मल्टीस्टेटच्या सौ. वनिता धपाटे यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. स्नेहा जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. रविराज गायकवाड, करिष्मा पटेल, रमिजा गाडिवान, राधा गायकवाड, प्रविण शिंदे, शुभांगी शिंदे, विनोद चुंगे, राजेंद्र माळी, ऐजाज कोतवाल, बाळू डोलार आणि लक्ष्मण उत्तरवाड यांनी सहकार्य केले.

2/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे