Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत आज राज्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत आज राज्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद

0 7 6 5 2 2

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत आज राज्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिष

मुंबई | प्रतिनिधी

राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून महत्त्वाची माहिती देण्यात येणार असून, यासंदर्भात आज मंगळवार (दि. १३ जानेवारी) रोजी मा. राज्य निवडणूक आयुक्त श्री. दिनेश वाघमारे यांची विशेष पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
सदर पत्रकार परिषद दुपारी ४ वाजता सह्याद्री अतिथिगृह, मलबार हिल, मुंबई येथे होणार असून, यावेळी निवडणूक प्रक्रिया, आरक्षण, मतदान कार्यक्रम, आचारसंहिता तसेच प्रशासकीय तयारीबाबत सविस्तर माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, आयोगाकडून होणाऱ्या घोषणांना विशेष महत्त्व आहे.राज्य निवडणूक आयोगाने सर्व वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांच्या संपादकांना व प्रतिनिधींना या पत्रकार परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित राहून निवडणुकांबाबतची अधिकृत व अचूक माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, अशी अपेक्षा आयोगाकडून व्यक्त करण्यात आली आहे.ही माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सहायक आयुक्त (जनसंपर्क) डॉ. जगदीश मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत आयोगाची भूमिका व पुढील दिशा आजच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे