ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
आचारसंहितेची पायमल्ली उघड! ‘धाराशिव 2.0’वर गुन्हा दाखल – ॲड, विशाल साखरेंच्या नोटीसेचा करारी झटका ! धाराशिव निवडणुकीत फेक सर्वेचा विस्फोट; गुन्हा दाखल होताच राजकारणात खळबळ

0
7
6
4
9
6
आचारसंहितेची पायमल्ली उघड! ‘धाराशिव 2.0’वर गुन्हा दाखल – ॲड, विशाल साखरेंच्या नोटीसेचा करारी झटका !
धाराशिव निवडणुकीत फेक सर्वेचा विस्फोट; गुन्हा दाखल होताच राजकारणात खळबळ
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव 2.0’ फेक एक्झिट पोल प्रकरणात गुन्हा दाखल
जिल्हा पोलीस अधीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीसेचा धसका
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे जिल्हा प्रवक्ते ऍड. विशाल साखरे यांच्या मागणीला यश
धाराशिव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा उघड उघड भंग करत सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या फेक एक्झिट पोलविरोधात अखेर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ‘धाराशिव 2.0’ या पेजवरून बनावट सर्वेक्षण व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर निर्माण झालेल्या वादळानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक आणि निवडणूक निर्णयअधिकाऱ्यांना पाठवलेल्या कायदेशीर नोटीसेचा स्पष्ट परिणाम दिसू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे जिल्हा प्रवक्ते ऍड. विशाल प्रभाकर साखरे यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले.
निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या ‘सायलंट पिरियड’मध्ये मतदानाआधीच्या ४८ तासांत – कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण किंवा एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई असतानाही ३० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७च्या सुमारास ‘धाराशिव 2.0’ या हँडलवरून बनावट (Bogus) टीव्ही चॅनेलच्या स्वरुपातील व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. या व्हिडिओमध्ये भाजप उमेदवार विजयी होत असल्याचा खोटा आभास निर्माण करण्यात आला होता, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकावर दाखवण्यात आले होते.
घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेत युवासेना तालुकाप्रमुख राकेश सूर्यवंशी व गोविंद कोळगे यांनी तात्काळ निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मीडिया सर्व्हेलन्स कक्षाचे नोडल अधिकारी तथा उपमुख्याधिकारी विश्वंभर सोनखेडकर यांनी सायबर पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद नोंदवली.
त्यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २२३, ३३७, ३५३, लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम १२६(A) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शकील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ऍड. विशाल साखरे यांनी दिलेल्या कायदेशीर नोटीसमुळे वाऱ्याचे झोत बदलले आणि ‘धाराशिव 2.0’ सह संबंधित अधिकाऱ्यांवरील कारवाईचा मार्ग मोकळा झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. निवडणूक प्रक्रियेचा दर्जा अबाधित ठेवण्यासाठी केलेली धडक कारवाई ही निवडणूक आयोगाच्या दृष्टीनेही महत्त्वाची पाऊल म्हणून पाहिली जात आहे.
0
7
6
4
9
6



