Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

महाराष्ट्र गौरव आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रदिप यादव व महादेव गपाट सन्मानित !

0 7 6 5 0 5

महाराष्ट्र गौरव आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रदिप यादव व महादेव गपाट सन्मानित !

कळंब : प्रतिनिधी

इंडियन कॉपरेट प्रोटेक्शन, मुंबई आणि सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा राज्यस्तरीय “महाराष्ट्र गौरव आदर्श शिक्षक पुरस्कार 2025” हा पुरस्कार धाराशिव जिल्ह्यातील दोन नामवंत शिक्षकांना — प्रदीप लालासाहेब यादव आणि महादेव तुकाराम गपाट — यांना ठाणे (कल्याण) येथे आयोजित भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार कार्यक्रम ठाणे (कल्याण) येथे पार पडला असून, या वेळी महेंद्र गोवर्धन गवई (इंडियन आर्मी), साक्षी नाईक (मराठी सिने अभिनेत्री), शिवकुमार साळुंके (अतिरिक्त आयुक्त, GST Pune), विजय दाजिंमभाई वघोला (मुख्य समीक्षक, मुंबई विभागीय मंडळ), डॉ. सुमित्रा पाटील (महिला उद्योजक, कोल्हापूर), काजल सुर्वे (मुंबई), श्रीमती मेहराजिमा शकील (अमरावती), रामजीत गुप्ता (मुख्य तपास अधिकारी, आयटी सेल मुंबई) आणि श्रीमती शीतल पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्याच्या हेतूने हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून निवड प्रक्रिया पार पडली असून, धाराशिव जिल्ह्यातून शिक्षक प्रदीप यादव आणि प्राचार्य महादेव गपाट यांची निवड झाली.

प्रदीप यादव हे श्री संत बोधले महाराज प्राथमिक विद्यामंदिर, औद्योगिक वसाहत कळंब (डिकसळ) येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर प्राचार्य महादेव गपाट हे देव धानोरा स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय येथे प्राचार्य पदावर कार्यरत आहेत.

या पुरस्कारामुळे धाराशिव जिल्ह्याचा सन्मान वाढला असून, दोन्ही शिक्षकांच्या कार्याचा सर्वत्र गौरव होत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान प्रेरणादायी ठरत असल्याचे मत स्थानिक व शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त केले जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे