Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

लोकमंगल मल्टीस्टेट सोसायटीतील कोट्यवधींच्या चोरीचा छडा; शिपाईच ठरला मास्टरमाइंड!

लोकमंगल मल्टीस्टेट सोसायटीतील कोट्यवधींच्या चोरीचा छडा; शिपाईच ठरला मास्टरमाइंड!

0 7 6 4 9 6

लोकमंगल मल्टीस्टेट सोसायटीतील कोट्यवधींच्या चोरीचा छडा; शिपाईच ठरला मास्टरमाइंड!

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

दोन महिन्यांपूर्वी तुळजापूर येथील लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मधून तब्बल २ कोटी १३ लाख १९ हजार ७०३ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली होती. अखेर या चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात अटक झालेला मुख्य आरोपी दुसरा तिसरा नव्हे तर लोकमंगल मल्टीस्टेट शाखेत कार्यरत असलेलाच शिपाई दत्ता नागनाथ कांबळे असल्याचे समोर आले आहे.

◾ काय आहे प्रकरण?

३ ऑगस्ट २०२५ रोजी तुळजापूर येथील लोकमंगल सोसायटीच्या शाखेतून ३४ लाख ६० हजार ८६० रुपये रोख आणि २ किलो ७२२ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण २ कोटी १३ लाखांहून अधिक किंमतीचा माल चोरीला गेला होता. शाखा व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता.गोरगरिब नागरिकांनी गरजेपोटी ठेवलेले दागिने चोरीला गेल्याने संपूर्ण जिल्ह्यात संताप आणि खळबळ उडाली होती.

◾पोलिसांसमोर होते मोठे आव्हान

चोरीची रक्कम मोठी असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासाची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे दिली. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि संशयास्पद हालचालींचे विश्लेषण केल्यानंतर दत्ता कांबळे याच्यावर संशय घेतला गेला. मात्र, तो उच्चशिक्षित व गुन्ह्याचे पूर्वनियोजन करून पळून गेलेला असल्याने त्याचा माग काढणे पोलिसांसाठी तारेवरची कसरत ठरली.

◾अखेर नागपूरमध्ये सापळा रचून अटक

दोन महिन्यांच्या अथक तपासानंतर स्थानिक गुन्हे शाखेला दत्ता कांबळे नागपूरमध्ये लपल्याची माहिती मिळाली. पथकाने नागपूरमध्ये सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरीचा मुद्देमाल लपविल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून ११ लाख रुपयांची रोकड आणि २ किलो १५९ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

◾आरोपी पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत

आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील चौकशीत उर्वरित मुद्देमाल आणि गुन्ह्यातील इतर संभाव्य सहभागींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

◾पोलिसांच्या धाडसी कामगिरीला दाद

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार आणि त्यांच्या पथकाने केली आहे.या कारवाईबद्दल पोलिस दलाचे सर्वत्र कौतुक होत असून, लोकमंगल सोसायटीतील बचतदारांनीही दिलासा व्यक्त केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे