ब्रेकिंगमहाराष्ट्र
पदापेक्षा माणुसकी मोठी! जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा आदर्श; स्वीय सहाय्यकाच्या सेवानिवृत्तीनिमित्त भावस्पर्शी प्रसंग
पदापेक्षा माणुसकी मोठी! जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा आदर्श; स्वीय सहाय्यकाच्या सेवानिवृत्तीनिमित्त भावस्पर्शी प्रसंग

0
7
6
5
0
5
पदापेक्षा माणुसकी मोठी! जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा आदर्श; स्वीय सहाय्यकाच्या सेवानिवृत्तीनिमित्त भावस्पर्शी प्रसंग
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
प्रशासनाच्या कडक चौकटीपलीकडे जाऊन माणुसकीचे दर्शन घडवणारा एक हृद्य प्रसंग सोमवारी (दि. २) धाराशिव येथे पाहायला मिळाला. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या संवेदनशील आणि आपुलकीच्या स्वभावाची पुन्हा एकदा प्रचिती आली.

त्यांच्या स्वीय सहाय्यक श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त हा प्रसंग अनेकांच्या मनाला स्पर्श करून गेला.श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांनी तब्बल ३५ वर्षे शासकीय सेवेत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि समर्पित भावनेने आपली जबाबदारी पार पाडली. त्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास जिल्हाधिकारी पुजार यांनी एक आगळावेगळा आणि भावनिक निर्णय घेतला. त्यांनी आपल्या शासकीय वाहनात श्री. कुलकर्णी यांना स्वतःच्या आसनावर बसवले, तर स्वतः मात्र समोर सुरक्षा रक्षकाच्या जागेवर बसून त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवले. त्यानंतरच ते आपल्या शासकीय निवासस्थानी परतले.हा केवळ एक औपचारिक निरोप नव्हता, तर अधिकारी–कर्मचारी नात्यातील जिव्हाळा, प्रामाणिक सेवेला दिलेली माणुसकीची दाद आणि नेतृत्वाची खरी व्याख्या सांगणारा क्षण होता. पद, अधिकार आणि प्रतिष्ठेपेक्षा माणुसकी मोठी असते, याचा वस्तुपाठ जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी या कृतीतून घालून दिला.कर्मचाऱ्यांशी कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणारे, त्यांच्या कार्याचा सन्मान करणारे आणि माणुसकी जपणारे अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी श्री. पुजार यांनी अनेकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या संवेदनशील नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

0
7
6
5
0
5



