ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
तुगाव येथे गुरुवारी दहावी अखिल भारतीय धम्म परिषद धम्मविचारांचा जागर; पंचशील ध्वजाखाली बुद्ध–आंबेडकरी विचारांचे रणशिंग

0
7
6
5
0
5
तुगाव येथे गुरुवारी दहावी अखिल भारतीय धम्म परिषद धम्मविचारांचा जागर; पंचशील ध्वजाखाली बुद्ध–आंबेडकरी विचारांचे रणशिंग
उमरगा | गोपाळ कांबळे
उमरगा तालुक्यातील तुगाव येथे गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर रोजी दहाव्या अखिल भारतीय धम्म परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. मागील नऊ वर्षांपासून सातत्याने आयोजित होत असलेल्या या धम्म परिषदेने तुगाव परिसरात धम्म चळवळीचे केंद्र म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे.या ऐतिहासिक धम्म परिषदेस बौद्ध अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे माजी प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे आणि भालचंद्र लोखंडे यांनी आवाहन केले आहे.या धम्म परिषदेत पूज्य भंते धम्मासार, भंते सुमेध नागसेन, भंते सुमंगल, भंते महाविरो थेरो यांच्यासह एस. के. कांबळे (चेले), हरिष डावरे, कैलास शिंदे, दिलीप भालेराव, बाबा गायकवाड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. परिषदेचे अध्यक्ष शाहूराज भोसले, स्वागताध्यक्ष भालचंद्र लोखंडे, तर नंदकुमार गायकवाड हे प्रमुख संयोजक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.या परिषदेत भगवान बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभावी जागर करण्यात येणार आहे. सकाळी भिक्षुसंघाच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येणार असून त्यानंतर भीम–बुद्ध गीतांचा भावस्पर्शी कार्यक्रम होणार आहे. पुढे भंतेजींची प्रेरणादायी धम्मदेसना होणार असून, या परिषदेतून धम्मविचारांची ऊर्जा घेण्यासाठी अनुयायांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेखाताई गायकवाड, संगीता गायकवाड, पार्वती गायकवाड, इंदुबाई भालेराव, अश्विनी नागटिळे, मंगल कांबळे, जितेंद्र कांबळे, जितेंद्र लोखंडे, बलभीम गायकवाड, सचिन बनसोडे, संकल्प कांबळे, डॉ. कमलाकर कांबळे, धर्मेंद्र कांबळे, राजकुमार कांबळे आदी परिश्रम घेत आहेत.
0
7
6
5
0
5



