ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजापूरात एकाच दिवशी सर्व आजारांवर मोफत उपचाराची संधी २३ मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालयात मोफत वैद्यकीय व दंत तपासणी शिबीर
स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानांतर्गत तुळजापूरात भव्य वैद्यकीय व दंत शिबीर

0
7
6
5
1
6
स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानांतर्गत तुळजापूरात भव्य वैद्यकीय व दंत शिबीर
तुळजापूरात एकाच दिवशी सर्व आजारांवर मोफत उपचाराची संधी २३ मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालयात मोफत वैद्यकीय व दंत तपासणी शिबीर
तुळजापूर : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर येथे ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत सोमवार, दि. २३ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत भव्य वैद्यकीय व दंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध आजारांवरील तपासणी, निदान, औषधोपचार तसेच शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नेत्ररोग तपासणीसह मोतीबिंदू शस्त्रक्रिया, फुफ्फुस विकारांवरील PFT मशीनद्वारे तपासणी, बालरुग्णांची संपूर्ण तपासणी व उपचार यांचा समावेश आहे.याशिवाय हर्निया, हायड्रोसिल, मुळव्याध, भंगदर यांसारख्या शस्त्रक्रिया, कान-नाक-घसा विकार, अस्थिरोग, मणक्याचे आजार, हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, थायरॉईड तपासणी, ईसीजी व विविध प्रयोगशाळा तपासण्या करण्यात येणार आहेत. कॅन्सर तपासणी (मुख, स्तन व गर्भाशय), स्त्रीरोग व गर्भवती मातांची तपासणी, त्वचारोग तसेच दंत चिकित्सा सेवा देखील शिबिरात उपलब्ध राहणार आहेत.विशेष म्हणजे किडनी रोगांसाठी तज्ज्ञांकडून तपासणी व आवश्यकतेनुसार डायलिसिस सुविधा, तसेच मोफत सोनोग्राफी, सिटीस्कॅन, रक्त तपासण्या व एक्स-रे सुविधा नागरिकांना मिळणार आहेत.
या उपक्रमासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास व वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिपक चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, आरोग्य रुग्नकल्याण समिती सदस्य आनंद कंदले व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.दिपक चोरमुले यांनी असे आवाहन केले आहे.
0
7
6
5
1
6



