ब्रेकिंगमहाराष्ट्र
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या तत्पर कारवाईमुळे मोटार चोरीप्रकरणी गुन्हा दाखल

0
7
6
4
9
6
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या तत्पर कारवाईमुळे मोटार चोरीप्रकरणी गुन्हा दाखल
धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या पाणबुडी मोटार चोरीच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी तात्काळ दखल घेत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जुनोनी (ता. जि. धाराशिव) येथील शेतकरी रामा भारत गायकवाड (वय ४०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वालगुड शिवारातील लघु प्रकल्प तळ्यामध्ये पाण्यात सोडण्यात आलेल्या एकूण चार पाणबुडी मोटारी व वायर असा सुमारे ७७ हजार रुपयांचा माल अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे उघड झाले आहे.ही चोरी दि. २४ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११ वाजल्यापासून दि. २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत तसेच यापूर्वी दि. ३ व १२ जानेवारी रोजी झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यामध्ये ५ एचपी, ७.५ एचपी क्षमतेच्या ॲन्सन, लाडा व सीआरआय कंपनीच्या पाणबुडी मोटारींचा समावेश आहे.या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने घटनास्थळी पाहणी करून पुरावे संकलित केले आहेत. चोरीचा तपास लवकरच निष्पन्न होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
0
7
6
4
9
6



