Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

दरोड्याच्या तयारीत असलेले पाच जण पोलिसांच्या जाळ्यात

दरोड्याच्या तयारीत असलेले पाच जण पोलिसांच्या जाळ्यात

0 7 6 5 0 5

दरोड्याच्या तयारीत असलेले पाच जण पोलिसांच्या जाळ्यात

वाशी : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांवर वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शेंडी शिवारातील कमळेश्वर पारधी पिडीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ करण्यात आली.
वाशी पोलीस ठाण्याच्या माहितीनुसार, आरोपी नामे-बबन रंगनाथ शिंदे, लहु आबा शिंदे, तानाजी अशोक काळे, सोनु बबन शिंदे, सुभाष शिवाजी शिंदे सर्व रा. पारा ता. वाशी जि. धाराशिव हे दि. 11.03.2026 रोजी 23.30 वा. सु. ते दि.12.03.2026 रोजी 00.10 वा. सु. शेंडी शिवारातील कमळेश्वर पारधी पिडीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र आले होते.
दरोड्याच्या तयारीनिशी स्प्लेंडर क्र. एमएच 25 बीडी 1310, मोटार सायकल क्र. एमएच 25 एआर 6320, लोखंडी कोयते 4, तलवार, कॅरीबॅगमध्ये तिखट पावडर असा एकूण 1,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल नमूद आरोपींच्या कब्जात वाशी पोलिसांना मिळून आला.
याप्रकरणी फिर्यादी नामे-बळीराम वसंतराव यादव, पोह/1516 नेमणूक पोलीस ठाणे वाशी यांनी दि.12.03.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून वाशी पोलीस ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 310(4),(5) सह कलम 4/25 शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे