Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

धारूरमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा; द्राक्ष, ऊस, कांदा पिकांचे मोठे नुकसान – युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश जगताप

धारूरमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा; द्राक्ष, ऊस, कांदा पिकांचे मोठे नुकसान - युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश जगताप

0 7 6 5 0 5

धारूरमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा; द्राक्ष, ऊस, कांदा पिकांचे मोठे नुकसान – युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश जगताप

धाराशिव : धारूर गावात रात्री झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला असून द्राक्ष बागा, ज्वारी, ऊस, कांदा, आंबा तसेच विविध फळबागा आणि पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अनपेक्षित पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.या पार्श्वभूमीवर नुकसानीचा आढावा घेण्यासाठी धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्हिडिओ कॉलद्वारे परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामा करण्याचे निर्देश दिले.

पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना नुकसानीचे त्वरित सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळावी, यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावे, असेही सांगितले. तसेच त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांची व्यथा जाणून घेतली आणि शासन त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांकडून तातडीने आर्थिक मदतीची मागणी होत असून प्रशासनाने लवकरात लवकर मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

धारूर परिसरातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीची सविस्तर माहिती युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश जगताप यांनी व्हिडिओ फोन कॉलद्वारे पालकमंत्री मा. ना. प्रताप सरनाईक यांना दिली.यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी, द्राक्ष बागा, ज्वारी, ऊस, कांदा, आंबा व इतर पिकांचे झालेले मोठ्या प्रमाणातील नुकसान याबाबत सविस्तर हकीकत मांडली. तसेच तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणीही करण्यात आली.पालकमंत्र्यांनीही परिस्थितीची गंभीर दखल घेत प्रशासनाला त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे