पोलीस असल्याची बतावणीकरून वृद्धाची फसवणूक; चार तोळ्याचे कडे व सोन्याची अंगठी लंपास
पोलीस असल्याची बतावणीकरून वृद्धाची फसवणूक; चार तोळ्याचे कडे व सोन्याची अंगठी लंपास
पोलीस असल्याची बतावणीकरून वृद्धाची फसवणूक; चार तोळ्याचे कडे व सोन्याची अंगठी लंपास
उमरगा : प्रतिनिधी
उमरगा शहराजवळ तब्बल 4 लाख 43 हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन अनोळखी व्यक्तींनी ‘आम्ही पोलीस आहोत’ अशी बतावणी करत एका वृद्ध नागरिकास थांबवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
फिर्यादी शशिकांत रुद्रप्पा चनपटने (वय 66, रा. कसगी, ता. उमरगा) हे दि. 19 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3.10 वाजता गुलबर्गा ते उमरगा चौरस्ता रोडवरून प्रवास करत असताना, प्रज्ञा पेपर कंपनीपासून सुमारे 100 मीटर अंतरावर दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले.
त्यांनी स्वतःला पोलीस असल्याचे भासवून “तुमचे सोने तपासणीसाठी आमच्याकडे द्या, पुढे परत देतो,” असे सांगून चार तोळ्याचे सोन्याचे कडे आणि पाच ग्रॅमची अंगठी असा एकूण 4,43,000 किंमतीचा ऐवज घेतला. त्यानंतर ते दोघेही बुलेट मोटरसायकलवर बसून फरार झाले.
या प्रकरणी फिर्यादी यांनी दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 419 (2) अन्वये गुन्हा नोंदवला असून, फसवणूक करणाऱ्या दोघा संशयितांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना ‘खरे पोलीस अधिकृत ओळखपत्र दाखवतात, शंका आल्यास तत्काळ 112 वर संपर्क साधा’ असा इशारा दिला आहे.



