ब्रेकिंगमहाराष्ट्र
ठाकरेंच्या गटाला धक्का! लोहाऱ्यातील तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राजकीय निर्णय; शिवसेनेत नव्या राजकीय समीकरणांची चर्चा

0
8
5
6
3
0
ठाकरेंच्या गटाला धक्का! लोहाऱ्यातील तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राजकीय निर्णय; शिवसेनेत नव्या राजकीय समीकरणांची चर्चा
लोहारा : तुळजापूरनामा
लोहारा तालुक्यातील राजकीय वर्तुळात महत्त्वाची घडामोड घडली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोहारा तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांबाबत चर्चेला उधाण आले आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत विकासाच्या वाटचालीत सहभागी होण्याच्या भूमिकेतून बिराजदार यांनी हा निर्णय घेतल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले. त्यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत करून त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
लोहारा तालुक्यात स्थानिक पातळीवर राजकीय हालचालींना वेग येत असताना, ठाकरे गटातील पदाधिकाऱ्याने शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याने या घडामोडीला महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी काळात या प्रवेशाचे स्थानिक राजकारणावर काय परिणाम होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
0
8
5
6
3
0



