ब्रेकिंगमहाराष्ट्र
वडगाव गणात “प्रमोद पाटील” लाट; आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या रणनितीमुळे महायुती विजयाच्या उंबरठ्यावर कमळ विरुद्ध मशाल : लढत निर्णायक वळणावर
बूथनिहाय रणनिती यशस्वी; प्रमोद पाटील यांच्या विजयाचा मार्ग मोकळा

0
7
6
4
9
7
वडगाव गणात “प्रमोद पाटील” लाट; आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या रणनितीमुळे महायुती विजयाच्या उंबरठ्यावर कमळ विरुद्ध मशाल : लढत निर्णायक वळणावर
तुळजापूर | धाराशिव तालुक्यातील वडगाव (सिं) जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात सध्या निवडणुकीचे रण तापले असून, महायुतीचे उमेदवार प्रमोद भाऊसाहेब पाटील व जिल्हा परिषद उमेदवार सौ. पूजा सचिन सरवदे यांच्या प्रचाराने प्रचंड वेग घेतला आहे. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नियोजनबद्ध, काटेकोर आणि आक्रमक रणनितीमुळे या गट व गणात महायुतीचा विजय जवळपास निश्चित मानला जात असून, संपूर्ण परिसरात “प्रमोद पाटील’ लाट स्पष्टपणे जाणवू लागली आहे.”मिनी मंत्रालय” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महत्त्वाच्या मतदारसंघात स्वच्छ प्रतिमा,विकासाभिमुख दृष्टिकोन आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांशी असलेली थेट नाळ ही प्रमोद पाटील यांची मोठी जमेची बाजू ठरत आहे. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, वीज व शेतकऱ्यांचे प्रश्न यावर त्यांनी मांडलेली ठोस आणि स्पष्ट भूमिका मतदारांच्या मनात घर करून गेली असून, त्याचा थेट फायदा प्रचारात दिसून येत आहे.वडगाव गट व गणातील तब्बल १७ गावांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष भेटी, बैठका, प्रचार फेऱ्या, रॅली आणि संवाद कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांशी थेट संपर्क साधला आहे. प्रथमच निवडणूक रिंगणात उतरूनही प्रमोद पाटील यांचा प्रचार अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि आक्रमक पद्धतीने सुरूअसून,कार्यकर्त्यांची मजबूत फळी बूथनिहाय काम करताना दिसत आहे. दुसरीकडे विरोधकांच्या गोटात मात्र अस्वस्थता आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.जिल्हा परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष नेताजी पाटील यांचे चुलत बंधू असलेले प्रमोद पाटील आणि सौ. पूजा सरवदे या जोडीला आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे भक्कम पाठबळ लाभले असून, त्यामुळे महायुतीची बाजू अधिकच मजबूत झाली आहे. कमळ चिन्हाच्या प्रचाराने गावोगावी जोर धरला असून, जनतेचा कलही महायुतीकडे झुकत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.या मतदारसंघात शेकापूर, पोहणेर, देवळाली, वडगाव (सिं), धारूर, उत्तमी कायापूर, बावी, कावलदरा, पळसवाडी, बेगडा, सुर्डी, पिंपरी, झरेगाव, चिलवडी, वलगुड, जुनवणी, वरवंटी, गावसुद आदी गावांचा समावेश असून, सुमारे २० ते २५ हजार मतदार आहेत. या सर्व गावांमध्ये सध्या महायुतीच्या बाजूने वातावरण तयार होत असल्याचे चित्र आहे.एकूणच वडगाव गट व गणात ‘प्रमोद पाटील’ लाट अधिक तीव्र होत चालली असून, येत्या दोन दिवसांत प्रचार आणखी रंगणार आहे. विकासाच्या मुद्द्यावर मतदारराजा अंतिम शिक्का मारणार असला, तरी सध्याचे राजकीय चित्र पाहता महायुतीचा विजय निश्चित दिशेने जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.कमळ विरुद्ध मशाल ही लढत जरी रंगतदार असली, तरी सध्या तरी महायुतीच्या उमेदवारांचे पारडे स्पष्टपणे जड असल्याचेच चित्र आहे.
0
7
6
4
9
7



