Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

सदस्यत्व लाभ व MSME विषयावर धाराशिवमध्ये सेमिनार; तुळजापूरमध्ये मान्यवरांचा सत्कार

सदस्यत्व लाभ व MSME विषयावर धाराशिवमध्ये सेमिनार; तुळजापूरमध्ये मान्यवरांचा सत्कार

0 7 6 4 9 7

सदस्यत्व लाभ व MSME विषयावर धाराशिवमध्ये सेमिनार; तुळजापूरमध्ये मान्यवरांचा सत्कार

धाराशिव / तुळजापूर : सुवर्णकार असोसिएशन फेडरेशन आणि सराफ सुवर्णकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्यत्व लाभ व MSME विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. हा सेमिनार दि. 14 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता धाराशिव येथे होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.या कार्यक्रमासाठी सौ. अर्चना भोसले (GJEPC), मुंबई तसेच सौ. अर्चना पांडे (MSME) या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहून सुवर्णकार समाजाला मार्गदर्शन करणार आहेत. सदस्यत्वाचे लाभ, उद्योग क्षेत्रातील संधी तसेच MSME योजनांबाबत सविस्तर माहिती या वेळी देण्यात येणार आहे.दरम्यान, सेमिनारपूर्वी त्या तुळजापूर येथे आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आल्या असता त्यांचा सत्कार करण्यात आला. जिजामाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष मधुकर शेळके यांच्या हस्ते मान्यवरांना आई तुळजाभवानीची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे