ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
“लाडक्या बहिणींचा” एकच सवाल… कोणाची सत्ता ठरेल? तुळजापूर निवडणुकीत १५,०१७ महिला मतदार ठरणार खरे “बहिणी”ठरणार गेमचेंजर”!
"बहिणी"ठरणार गेमचेंजर"!
0
7
6
4
9
6
“लाडक्या बहिणींचा” एकच सवाल… कोणाची सत्ता ठरेल?

तुळजापूर निवडणुकीत १५,०१७ महिला मतदार ठरणार खरे “बहिणी”ठरणार गेमचेंजर”!
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर नगरपरिषदेचे राजकारण या वेळी एका वेगळ्याच दिशेने वळले आहे. कारण २९,५५५ पैकी तब्बल १५,०१७ – म्हणजे ५२% महिला मतदार! ‘लाडक्या बहिणींचे हात वाकडे नसतात’ ही म्हण यंदा निवडणुकीत अक्षरशः सत्य ठरताना दिसत आहे. कोणाची सत्ता? कोणाचा विजय? कोणाचा पराभव? हे सर्व काही बहिणींच्या ‘मत-निर्णया’वर अवलंबून राहणार!
पक्षांचे गणित हादरले… बहिणींच्या मनाचा कोड उलगडणे कठीण!
अनेक प्रभागांत महिला मतदार पुरुषांपेक्षा जास्त. घरगुती समस्या, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्ते-नाले… या प्रश्नांवर बहिणींची पकड घट्ट. त्यामुळे महायुती-आघाडी दोघांच्याही ‘मायक्रो प्लॅनिंग’ला कात्री! उमेदवारांचे घोषणा-पत्र, भेटीगाठी, वायदे—सगळंच बहिणींच्या भल्याभोवती फिरताना दिसत आहे.
“काम दाखवा, मगच मत मिळेल”… बहिणींचा स्पष्ट संदेश!
यावेळी बहिणी नाराज – आणि प्रचंड!
• पाणीपुरवठा विस्कळीत
• कचरा व्यवस्थापन ढप्प
• गटार-रस्त्यांची दैना
जे उमेदवार या प्रश्नांवर ठोस कामाचे आश्वासन देतायत, त्यांच्याकडे बहिणींचा कल वेगाने झुकतोय.अनेक प्रभागांत २००-३०० मतांची उलथापालथ शक्य… आणि ही उलथापालथ करणार कोण? लाडक्या बहिणी!
“किंगमेकर”नव्हे… थेट “किंगमेकर-इन-चीफ”!
गेल्या निवडणुकांमध्ये बहिणींनी ज्या उमेदवाराला पसंती दिली, तो थेट विजयी-हेच समीकरण पुन्हा दिसू लागले आहे. या वेळी तर महिला मतांचे ध्रुवीकरण अधिक तीव्र.”ज्या उमेदवारावर बहिणी माया दाखवतील, त्याचीच नगरपरिषदेत एंट्री पक्की!”
स्त्रीशक्तीचा निर्णायक उदय
तुळजापूरच्या राजकारणात शांततेतही दमदार आवाज उठवणाऱ्या बहिणी आता थेट सत्ता-निर्णयाच्या केंद्रस्थानी. घरातील दिव्यांपुरत्या नव्हे -तर संपूर्ण नगरपरिषदेचे भवितव्य ठरवणाऱ्या निर्णयकर्त्या!
अखेरीचा सवाल -“बहिणींची पसंती कोणाला?”
याचे उत्तर मिळाले की, नगरपरिषदेचा कळस कोणाच्या डोक्यावर चढतो, हे स्पष्ट होईल. यंदाची निवडणूक एकच सांगते तुळजापूरचा निकाल पक्षनिष्ठेने नव्हे…”लाडक्या बहिणींच्या” आशीर्वादाने ठरणार आहे!
0
7
6
4
9
6



