ब्रेकिंगमहाराष्ट्र
तांत्रिक तपासातून गहाळ मोबाईलचा शोध; मूळ मालकाच्या ताब्यात सुपूर्द
तुळजापूर पोलिसांची तत्पर कारवाई; पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या हस्ते मोबाईल परत

0
8
5
6
3
1
तांत्रिक तपासातून गहाळ मोबाईलचा शोध; मूळ मालकाच्या ताब्यात सुपूर्द
तुळजापूर पोलिसांची तत्पर कारवाई; पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या हस्ते मोबाईल परत
तुळजापूर : तुळजापूर येथील रितेश रोशन गिराणी यांचा ओपो कंपनीचा मोबाईल दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी गहाळ झाला होता. या प्रकरणी तुळजापूर पोलिसांनी तांत्रिक माध्यमांचा वापर करून मोबाईलचा यशस्वी शोध घेतला.
यानंतर दि. ६ जुलै २०२६ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्यादी रितेश रोशन गिराणी यांना बोलावून पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या हस्ते गहाळ झालेला मोबाईल मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आला.यावेळी पोलिस साबर बीट अंमलदार मारुती माळी, नगरसेवक विजय कंदले आदी उपस्थित होते.तांत्रिक तपासाच्या माध्यमातून गहाळ मोबाईलचा शोध घेऊन तो मूळ मालकास परत मिळवून दिल्याबद्दल तुळजापूर पोलिसांच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
0
8
5
6
3
1



