Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तेरणा अभियांत्रिकीच्या २९ विद्यार्थ्यांनी इन्फोसिस या जगप्रसिद्ध आयटी कंपनीची इंटर्नशिप केली यशस्वीरीत्या पूर्ण

तेरणा अभियांत्रिकीच्या २९ विद्यार्थ्यांनी इन्फोसिस या जगप्रसिद्ध आयटी कंपनीची इंटर्नशिप केली यशस्वीरीत्या पूर्ण

0 7 6 5 0 5

तेरणा अभियांत्रिकीच्या २९ विद्यार्थ्यांनी इन्फोसिस या जगप्रसिद्ध आयटी कंपनीची इंटर्नशिप केली यशस्वीरीत्या पूर्ण

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय धाराशिव , इन्फोसिस आणि डीटीई महाराष्ट्र यांच्या मार्फत दरवर्षी बी.टेक.च्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप चे आयोजन केले जाते . इंटर्नशिप मध्ये विद्यार्थी हे कंपनीत चालू असलेल्या प्रोजेक्ट मध्ये कंपनीत कुशल इंजिनीअर्स , मॅनेजर्स समवेत काम करतात . अशा इंटर्नशिप्स मुळे कंपनीत कुठले ज्ञान , टेक्नॉलॉजी गरजेचे आहे आणि व्यावहारिकपणे विचार करायची बुद्धी विकसित होते .समाजातील विविध प्रश्नांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडवले गेले . विविध ठिकाणचे पाण्याची गुणवत्ता चाचणी , ऑटोनॉमस सिस्टिम्स ,तेल पाइपलाईन गळती ओळखणे एआय च्या माध्यमातून , शहरात लागणारे राइड शेअरिंग अँप , नेटलीक्स एनलायझर हॉटेल दुकानाचे नफा विश्लेषण अश्या प्रोजेक्ट्वस वर विदयार्थ्यांनी काम केले. तेरणाच्या यावर्षी ऑगस्ट २०२५ ते मे २०२६ या काळात एकूण २९ विदयार्थ्यांनी बीटेकच्या दुसऱ्या , तिसऱ्या वर्षीच इंटर्नशिपचा महत्वाचा अनुभव घेतला . कंपनीने दिलेले कोर्सेस पूर्ण केल्यानंतर त्यांची निवड करण्यात आली आणि दररोज सॉफ्टवेअर प्रॉजेक्ट्स च्या सुधारणेविषयी कंपनीच्या मेंटॉर सोबत आढावा बैठक असत . इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन , आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स , कंप्यूटर सायन्स अँड इंजियनीरिंग च्या विदयार्थ्यांनी या इंटर्नशिप मध्ये सहभाग घेतला .क्लाउड कम्प्युटिंग ,पायथॉन प्रोग्रामिंग , एआय ,फुल स्टॅक डेव्हलपमेंट ,जावा टेक स्टॅक ,डेटा व्हिज्युअलायझेशन , प्रोजेक्ट मॅनेजमेंट अशा कंपनी मध्ये डिमांड असलेल्या तंत्रज्ञानावर विद्यार्थ्यांनी काम केले . याचा भविष्यात उपयोग प्लेसमेंट साठी तसेच चांगले प्रोजेक्ट मिळण्यासाठी होतो . इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागाच्या ओंकार लकडे , इंगळे भूमिका , वैष्णवी पाटील , संगणक विभागाच्या रोहिणी पांढरे , संध्याराणी पवार ,साक्षी शिंदे ,स्नेहा बुरगुटे , अंजली जकाते ,अल्सफा अरब , प्रताप बोंदर , आर्टिफिशिअल इंटेलिजन्स विभागातून निकिता जगताप , तेजल ससाणे , विशाखा चंदने ,राजनंदिनी शिंदे , अनिशा अंबुरे , संजीवनी शेळके ,सलोनी सुरडकर ,सुमित ढेंगळे ,श्रावणी सूर्यवंशी ,अदिती घोगरे ,साक्षी सलगरे ,साक्षी गोटे , समृद्धी मसलगे ,राजनंदिनी मोकाशी ,अंजली खारगे ,सुजित सूर्यवंशी , मानिनी ढाकरे ,अर्पिता मुळे सानिया मुल्ला या विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप पूर्ण केली आणि नवीन तंत्रज्ञान शिकल्या बद्दल समाधान व्यक्त केले .महाविद्यालयाचे इन्फोसिस एसपीओसी म्हणून प्रा,अनिरुद्ध देशपांडे यांनी काम पहिले . विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या कौशल्य आधारित उपक्रमात जास्तीत जास्त सहभागी झाल्याने यश मिळतेच असा विश्वास दर्शविला . विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ .पदमसिंहजी पाटील साहेब , महाराष्ट्र शासनाच्या मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील , कार्यकारी विश्वस्त मल्हार पाटील , सर्व विश्वस्त ,व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे , प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने , सर्व विभागप्रमुख तसेच प्राध्यापकांनी अभिनंदन केले .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे