ब्रेकिंगमहाराष्ट्र
धाराशिवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्याला ‘ट्विस्ट’; शिवसेना प्रवक्ते ॲड,योगेश केदार,युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश जगताप,युवा नेते गणेश देवानंद रोचकरी हे स्वागताऐवजी शिवसैनिक नजरकैदेत.
धाराशिवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्याला ‘ट्विस्ट’; शिवसेना प्रवक्ते ॲड,योगेश केदार,युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश जगताप,युवा नेते गणेश देवानंद रोचकरी हे स्वागताऐवजी शिवसैनिक नजरकैदेत.

0
7
6
4
9
6
धाराशिवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्याला ‘ट्विस्ट’; शिवसेना प्रवक्ते ॲड,योगेश केदार,युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश जगताप,युवा नेते गणेश देवानंद रोचकरी हे स्वागताऐवजी शिवसैनिक नजरकैदेत.
तुळजापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या धाराशिव दौऱ्यात अनपेक्षित घडामोडी घडल्या. स्वागताच्या जय्यत तयारीऐवजी स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच पोलिसांचा ‘पाहुणचार’ घ्यावा लागल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीतील तिकीट वाटपावरून पेटलेल्या अंतर्गत वादाने विमानतळावरच उग्र रूप धारण करत शिवसेनेतील गटबाजी उघड केली.
▪️तिकीट वाटपावरून नाराजी; २५ कार्यकर्ते ताब्यात
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या आगमनापूर्वीच नाराज शिवसैनिकांनी थेट त्यांच्यासमोर आपली भूमिका मांडण्याची तयारी केली होती. सोशल मीडियावरही त्याचे संकेत देण्यात आले होते. मात्र संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ‘ऑपरेशन धरपकड’ राबवून तब्बल २५ कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले.
▪️विमानतळावरच वाद; ‘VIP पास’वरून संताप
शिंदे यांच्या स्वागतासाठी आलेल्या शिवसैनिकांना विमानतळाच्या प्रवेशद्वारावरच अडवण्यात आले. यामुळे पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाली.
“आमदार आणि त्यांच्या कुटुंबियांना VIP पास मिळतो मग जिल्हाप्रमुखाला का नाही?” असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.
▪️प्रमुख नेत्यांनाही ‘नजरकैद’
युवासेनेचे नेते अविनाश खापे पाटील, नितीन पाटील, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश जगताप तसेच गणेश देवानंद रोजकरी यांना तुळजापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. अनेक कार्यकर्त्यांना सकाळी घरातूनच उचलून पोलीस ठाण्यात बसवण्यात आले.
शिवसेना प्रवक्ते योगेश केदार यांनाही बेंबळी पोलीस ठाण्यात नजरकैदेत ठेवण्यात आले असून त्यांच्या घरावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
▪️भाजप आमदारांवर गंभीर आरोप
या संपूर्ण कारवाईमागे भाजप आमदार यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप योगेश केदार यांनी केला आहे.
“भाजप आमदारांच्या इशाऱ्यावरून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला.
▪️‘रेड कार्पेट विरुद्ध पोलीस कोठडी’ – कार्यकर्त्यांची खदखद
एकीकडे नेत्यांसाठी रेड कार्पेट आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांसाठी पोलीस कोठडी, असे विरोधाभासी चित्र धाराशिवमध्ये पाहायला मिळत आहे. यामुळे शिंदे गटातील अंतर्गत नाराजी आता उफाळून आली आहे.
▪️डॅमेज कंट्रोलची कसोटी
शिंदे यांच्या दौऱ्यात उघड झालेल्या या गटबाजीमुळे पक्षातील एकोपाावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आता एकनाथ शिंदे हे या नाराजीवर डॅमेज कंट्रोल करण्यात कितपत यशस्वी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
▪️नियोजित सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई करत शिवसेना नेते गणेश देवानंद रोचकरी यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना तुळजापूर पोलिस ठाण्यात नजरकैदेत ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सभेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. परिसरात पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
0
7
6
4
9
6



