Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूर नगर परिषद निवडणूक – १४१ पैकी १० जण नगराध्यक्षपदाच्या रिंगणात !

नामनिर्देशनाच्या दुसऱ्या दिवशी रंगले राजकीय गणित!

0 7 6 4 9 6

तुळजापूर नगर परिषद निवडणूक – १४१ पैकी १० जण नगराध्यक्षपदाच्या रिंगणात !

नामनिर्देशनाच्या दुसऱ्या दिवशी रंगले राजकीय गणित!

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या नामनिर्देशन प्रक्रियेला आज मोठी गती मिळाली. दि. १६ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्षपदासाठी तब्बल १० उमेदवारांकडून १० नामनिर्देशनपत्रे दाखल होताच तुळजापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तर नगरसेवक पदासाठी १४१ उमेदवारांचे १४१ अर्ज दाखल झाले असून सर्व प्रभागांत स्पर्धा चुरशीची होण्याचे संकेत ताकदीने पुढे आले आहेत.

उद्याचा दिवस नामनिर्देशनाचा शेवटचा असल्यामुळे शेवटच्या क्षणी अजून कोण सरप्राइज देतील याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. शहरात “कोण कोण येणार मैदानात?” रविवारी दिवसभर चर्चेला उधाण आले होते.

▪️नगराध्यक्षपदाची प्रमुख शर्यत – कोण मारणार बाजी?

▪️विनोद गंगणे – अपक्ष व भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा
शांत स्वभाव,पण संघटनशक्ती प्रबळ.भाजपचा अप्रत्यक्ष पाठींबा त्यांच्या नावाला बळकटी देतोय.

▪️सचिन रोजकरी – अपक्ष व भाजप पाठिंबा तरुण नेतृत्व, सोशल मीडिया ते बूथस्तरापर्यंत सक्रीय.भाजप गटातील आंतरिक स्पर्धा वाढवणारी एन्ट्री.

▪️देवानंद रोचकरी -शिंदे शिवसेना सत्तारूढ शिवसेना (शिंदे गट) ची अधिकृत मोहोर. सरकारी यंत्रणेतली गती, स्थानिक संपर्क जाळे यांच्यावर भरवसा.

▪️सज्जन साळुंके – तुळजापूर शहर विकास आघाडी
▪️सज्जन साळुंके – भारतीय जनता पार्टी एकाच नावाने दोन आघाड्यांतून दाखल झालेले अर्ज आजच्या दिवशीची सर्वात मोठी चर्चा ठरली. कोणता अर्ज अधिकृत? कोणत्या गटाचे वर्चस्व? हे उद्या होणाऱ्या पडताळणीत स्पष्ट होणार.

▪️अमोल कुतवळ – काँग्रेस
काँग्रेसची शांत पण आक्रमक मजबूत नेतृत्व फिल्डिंग. पारंपरिक मतदार आणि युवकांचा पाठिंबा बळ देणारा.

▪️ १४१ जागांतून १० चेच अर्ज — चित्र अजून गुंतागुंतीचे राजकारण ?

तुळजापूर शहरातील ११ प्रभागांतून २३ उमेदवारासाठी एकूण १४१ स्थानिक पदांसाठी या वर्षी भल्या सकाळीच वातावरण तापले आहे. नामनिर्देशनाचा आजचा दिवस तुलनेने गजबजलेला ठरला असला तरी उद्या खरा रंगतदार दिवस असणार हे निश्चित आहे.
पक्षांतील आंतरिक खेळी, गठबंधनाच्या चर्चा आणि अपक्षांच्या दमदार एन्ट्रीमुळे तुळजापूर निवडणूक २०२५ एकतर्फी न राहता पूर्ण ताकदीची,जोरदार आणि रोमहर्षक ठरणार हे आजच स्पष्ट झाले आहे.

3/5 - (2 votes)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे