Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

क्रेन कप्पीचा विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात होत्याचे नव्हते;केशेगावात शेतात काम करताना विजेचा कहर; बाप-लेकासह चौघांचा जागीच अंत

0 7 6 5 0 5

क्रेन कप्पीचा विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात होत्याचे नव्हते;केशेगावात शेतात काम करताना विजेचा कहर; बाप-लेकासह चौघांचा जागीच अंत

तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर तालुक्यातील इटकळ परिसरातील केशेगाव येथे शनिवारी (दि. २७) दुपारी घडलेल्या हृदयद्रावक विद्युत दुर्घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला. शेतातील विहिरीवरील काम सुरू असताना क्रेन कप्पीचा महावितरणच्या जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाला आणि क्षणातच विजेच्या भीषण धक्क्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये बाप-लेकासह दोन मजुरांचा समावेश असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.केशेगाव येथील गणपती शिवाप्पा साखरे यांच्या शेतात विहिरीतील पाणबुडी (सबमर्सिबल पंप) बाहेर काढण्यासाठी दुपारी क्रेनच्या सहाय्याने काम सुरू होते.

यावेळी पंप वर काढत असताना क्रेन अचानक अधिक उंच गेली आणि शेतातून जाणाऱ्या महावितरणच्या जिवंत विद्युत वाहिनीस तिचा स्पर्श झाला.विद्युत तारेला लागलेल्या क्रेनमधून क्षणार्धात प्रचंड विद्युत प्रवाह खाली उतरला. त्या वेळी क्रेनजवळ व खाली काम करत असलेल्या चौघांना एकाच वेळी जोरदार विजेचा धक्का बसला. धक्का इतका तीव्र होता की चौघांचाही जागीच मृत्यू झाला.या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील वडील व मुलग्याचा दुर्दैवी अंत झाल्याने साखरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

कामासाठी आलेल्या दोन मजुरांनाही आपल्या प्राणांची किंमत मोजावी लागली. एका क्षणात चार जणांचे प्राण गेल्याने केशेगाव गाव सुन्न झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, शेतातून जाणाऱ्या महावितरणच्या विद्युत वाहिन्यांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे